Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीकोयना धरणातून पाणी सोडणार; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून पाणी सोडणार; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून पाणी सोडणार; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा.

पाटण:- कोयना धरण परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून आज सकाळी ६ वा. धरणातील पाणी साठा ८२.२४ टी.एम.सी झाली आहे. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद ६२ हजार ८३ क्युसेक्स इतकी होत असल्याने धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षीच्या पुरपरस्थितीचा व धरणात वाढत असलेल्या पाण्याचा अंदाज घेऊन आज सकाळी ११ वा. पायथा विजगृहातून १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तर वेळेनुसार धरणाचे वरीसहा वक्र दरवाज्यातून देखील पाणी सोडण्यात येणार आहे. नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे असा इशारा धरण व्यवस्थापना कडून देण्यात आला आहे.
आज सकाळी ६ वा. कोयना धरणातील पाणीपातळी २१४३.०८ इंच तर ६५३.३९० मीटर इतकी झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद ६२ हजार ८३ क्युसेक्स होत असताना पाणी साठा ८२.२४ टी.एम.सी. झाला आहे. काल सायंकाळी ५.३० वा. ते आज सकाळी ६ वा. पर्यंत धरण परिसरातील कोयना येथे – १०१ हि.मी., नवजा- १०८ मि.मी., नवजात – १५८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular