- कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर पाटण तालुक्यात स्वातंत्र्य दिन साध्या पध्दतीने साजरा..
कोरोनाच्या संकटावर विजय निश्चित मिळणार- प्रांत श्रीरंग तांबे
पाटण :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर पाटण तालुक्यात साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या पाटण तहसील कार्यालयात प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी तहसीलदार समीर यादव, पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, नायब तहसीलदार प्रशांत थोरात, लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहण झाल्यानंतर स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोरोना सारख्या महासंकटात उल्लेखनीय कार्य करणा-या कोरोना योध्दांचा सन्माणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्रायोगिक तत्वावर पुरवठा शाखा महादेव अष्टेकर, पाटणचे तलाठी जय शिरोडे, दिपक कांबळे, पोलिस नाईक भरते, पोलिस नाईक पाटील, प्रशान्त चव्हाण यांना गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी श्रीरंग तांबे म्हणाले देशावर गेले पाच महिने कोरोनाचे सावट पसरले आहे. याचा सामना प्रशासकीय यंत्रणे बरोबर सर्व सामान्य नागरिक देखील करत आहेत. या संकटांवर विजय नक्कि मिळणार आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून ७४ वा स्वातंत्र्य दिन सगळीकडे साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत या संकटावर मात करून यश मिळणार आहे. पुढील वर्षीचा ७५ वा स्वातंत्र्य दिन सर्वजण मोठ्या थाटात साजरा करु असे त्यांनी सांगितले.
दरम्यान पाटण शहरात नगरपंचायतच कर्यालय येथे नगराध्यक्ष संजय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पंचायत समिती पाटण येथे सभापती राजाभाऊ शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोयना धरण प्रकल्प येथे धरण व्यवस्थापन अभियंता कुमार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पाटण एस.टी. आगार येथे आगारप्रमुख ऊतले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पाटण तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, बैंका येथे साध्या पध्दतीने सोशल डिस्टिंक्शन चे अंतर ठेवून ध्वजारोहण करण्यात आले.