Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीशेतकरी, व्यापारी, कामगारांसाठी शिवदौलत बैंकेच्या नवीन - सुलभ कर्ज योजना- यशराज देसाई.

शेतकरी, व्यापारी, कामगारांसाठी शिवदौलत बैंकेच्या नवीन – सुलभ कर्ज योजना- यशराज देसाई.

* शेतकरी, व्यापारी, कामगारांसाठी शिवदौलत बैंकेच्या नवीन – सुलभ कर्ज योजना- यशराज देसाई.
* कोरोना काळात अडचणीत आलेल्या ग्राहकांना बैंकेचा दिलासा.

पाटण:- कोरोना काळात सर्वांना अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा अडचणीतून बाहेर येण्यासाठी पाटण तालुक्यातील शेतकरी, कामगार, व्यापारी यांचे हित लक्षात घेऊन शिवदौलत सहकारी बैंकेने कमी व्याजदरात नवीन व सुलभ कर्ज योजना सुरु केलेल्या आहेत. या कर्ज योजनांचा पाटण तालुक्यातील शेतकरी, कामगार, व्यापारी वर्गांनी लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन युवानेते यशराज देसाई यांनी मल्हारपेठ ता. पाटण येथे शिवदौलत बैंकेच्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना केले.
यावेळी बैंकेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, उपाध्यक्ष संजय देशमुख, मुख्य व्यवस्थापक शिवाजीराव जाधव यांची उपस्थिती होती. युवानेते यशराज देसाई पुढे म्हणाले बैंकेने सभासदांसाठी शिवदौलत शेतकरी सन्मान कर्ज योजना, शिवदौलत व्यापारी मित्र कर्ज योजना आणि शिवदौलत कामगार मित्र कर्ज‌‌‌ योजना सुरू केल्या आहेत. या योजनात २५ हजार ते १ लाख २५ हजार रुपये पर्यंतचे कर्ज शेतकरी व व्यापारी वर्गासाठी असून २ लाखा पर्यंतचे कर्ज कामगारांसाठी असणार आहे.
शिवदौलत शेतकरी सन्मान कर्ज योजना केवळ एका जामीनदारावर दिले जाणार असून या कर्जाचा वार्षिक हप्ता आकारला जाणार आहे. या कर्जाची मुदत तीन वर्षांसाठी असणार आहे. शिवदौलत व्यापारी मित्र कर्ज योजना बैंकेत नियमित पिग्मी भरणाऱ्या व्यापारांसाठी असून हे कर्ज एक वर्ष मुदतीसाठी असणार आहे. हे कर्ज कागदपत्रांची पूर्तता झाल्यापासून २४ तासात मंजूर करण्यात येणार आहे. तर शिवदौलत पगार तारण कर्ज योजनेत लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग समुहातील सेवकांचा पगार शिवदौलत बैंकेत गेली बारा महिने जमा होत आहे. अशा सर्व सेवकांसाठी तीन वर्ष मुदतीने पगाराच्या प्रमाणात २५ हजार रुपये ते २ लाखा रुपये पर्यंत कैश क्रेडिट स्वरुपात तात्काळ देण्याचे धोरण संचालक मंडळाने ठरवले आहे. या कर्ज योजनांची अंमलबजावणी बैंकेच्या सर्व शाखांमधून करण्यात आली आहे. असून बैंकेच्या सभासद ग्राहकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन यशराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत शेवटी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular