स्टँम्पव्हेंडर यादवराव देवकांत (बापू) यांचे निधन
पाटण:- पाटण शहरातील सर्वांचे परिचित सर्व समावेशक बहुआयामी व्यक्तिमत्त्व पाटण तहसील कार्यालयातील प्रसिद्ध स्टँम्पव्हेंडर, मुद्रांक विक्रेता संघटनेचे तालुकाध्यक्ष यादवराव तातोबा देवकांत (बापू) यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने सह्याद्री हौस्पिटल कराड येथे उपचार सुरू असताना दु:ख निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पाटण शहरासह परिसरात समजताच सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.
यादवराव देवकांत हे बापू या नावाने सगळीकडे परिचित होते. गेली चाळीस वर्षे ते पाटण तहसील कार्यालयात मुद्रांक विक्रेता म्हणून काम करत होते. पाटण तालुक्यातील अथवा शहरातील प्रत्येक उत्सव, कार्यक्रमात त्यांचा हिरहिरीने सहभाग होता. सामाजिक कार्यात देखील ते हरहुन्नरीने सहभाग घेत होते. दिलखुलास बहुआयामी व्यक्तिमत्त्व.. जुन्या काळापासून पाटण शहरातील सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील साक्षीदार आणि पाटणच्या सांस्कृतिक क्षेत्राचा चालता-बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड.. गेल्याने बापूंना विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांना श्र्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर सह्याद्री हौस्पिटल कराड येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची आज सकाळी ८ वा. प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाची बातमी पाटण शहरासह तालुक्यात समजताच सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले, सुना – नातवंडे असा मोठा परिवार आहे.