कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पाटण ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा त्वरीत भरा.. अन्यथा रुग्णालय बंद करणार..
पाटण :- पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असताना येथील ग्रामीण रुग्णालय आरोग्य कर्मचारी विना ओस पडले आहे. वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्स आरोग्य कर्मचारी यांच्या अनेक जागा रिक्त असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत. तर सद्या एकूण सरासरी चाळीस जणांचा स्टाफ असलेल्या या रुग्णालयात केवळ १४ कर्मचाऱ्यांचा स्टाफ भरला असून हजर असलेल्या आरोग्य कर्मचारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडलेला दिसत आहे. त्यात ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य कर्मचारी यांच्यासह रुग्णांची दैनीय अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत पाटण चे ग्रामीण रुग्णालय रुग्णांसाठी असुन अडचण झाली आहे. कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर जिल्हा आरोग्य विभागाचे देखील पाटणच्या ग्रामीण रुग्णालयाकडे पुर्णतः दुर्लक्ष असून या रुग्णालयात सोमवार अखेर रिक्त जागा त्वरीत भरल्या नाहीतर मराठा – बहुजन क्रांती मोर्चा, सामाजिक ऐक्य परिषदेकडून पाटण चे ग्रामीण रुग्णालय पूर्ण बंद केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
पाटणच्या ग्रामीण रुग्णालयातील मुख्य डॉक्टर यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्यामुळे या ठिकाणी जबाबदार डॉक्टर असे कोणी नाही. नर्स पैकी तीन जागा रिक्त असताना देखील हजर असलेल्या पैकी एक नर्स प्रतिनियुक्तीवर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. कॉट्रेंक्ट बेसवर घेतलेले बालरोग तज्ज्ञ हे देखील आजारी असल्यामुळे सामान्य रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. १०८ ची सुविधा आसलेली अॅंब्युलन्स देखील केविड रुग्णांसाठी घेतलेली असल्यामुळे इतर सर्व सामान्य रुग्णांची गैरसोय होत आहे. सद्या पाटण ग्रामीण रुग्णालयात मेडिकल सुपरिटेंडेंट – १ जागा असून तीही रिक्त आहे. मेडिकल ऑफिसर – ३ जागा असून पैकी १ जागा भरलेली असताना हे मेडिकल ऑफिसर कोरोना पॉझिटिव्ह असून कोरोनटांईन आहेत. १ जागा कॉंट्रेक्ट बेसवर आहे. तर १ जागा रिक्त आहे. ७ स्टाफ नर्स पैकी ५ जागा भरलेल्या असून पैकी १ नर्स सातारा येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. सद्या केवळ ४ नर्स वर रुग्णालयाचा संपूर्ण भार पडला आहे. ऑफीस सुपरिटेंडेंट १ जागा असून तिही रिक्त आहे. क्लार्कच्या २ पैकी १ जागा रिक्त आहे. स
शिपाई १ जागा तीही रिक्त आहे. फार्मासिस्ट २ जागा पैकी १ जागा रिक्त आहे. वार्डबॉय – १ जागा रिक्त आहे. लॅब टेक्नीशिएन १ जागा असून तीही रिक्त आहे. स्वीपर, ड्रायव्हर ची १ – १ जागा रिक्त आहे. तर सफाई कामगारांच्या दोन ४ जागा असून पैकी २ रिक्त आहेत. असलेल्यांना चार महिने पगार नाही अशी परिस्थिती पाटण ग्रामीण रुग्णालयाची झाली आहे. तरी देखील पाटणकडे वरिष्ठांचे लक्ष जात नाही हे दुर्दैव आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर सोमवार अखेर ग्रामीण रुग्णालयाच्या रिक्त जागा भरल्या नाहीतर मराठा – बहुजन क्रांती मोर्चा सामाजिक ऐक्य परीषदेकडून ग्रामीण रुग्णालय बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना यशवंतराव जगताप, राजाभाऊ काळे, शंकर मोहिते, मंगेश पाटणकर, राकेश सोनावले, संदिप शिंदे यांची उपस्थिती होती.