Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडीराज्यमंत्र्यांच्या तालुक्यात शेतकरी रस्त्यावर ; ढगफुटीत झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकरी रस्त्यावर ;...

राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात शेतकरी रस्त्यावर ; ढगफुटीत झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकरी रस्त्यावर ; विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा रस्ता रोको..

पाटण:- बुधवारी रात्री पाटण तालुक्यात अचानक झालेल्या ढगफुटीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सलग तीन वर्षे होत असलेल्या अतिवृष्टीत शेतकरी मेटाकुटीला आला असुन आता पंचनाम्यांचा दिखावा नको तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने डायरेक्ट मदत द्यावी या मागणीसाठी शनिवारी सकाळी विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी कराड – चिपळूण रस्त्यावर पाटण येथील केरापुलावर रस्ता रोको केला. किमान दिड तास झालेल्या या रस्तारोकोत वाहनांच्या दोन्ही बाजूने लांबलचक रांगा लागल्या. अचानक झालेल्या या रस्तारोकोमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली यावेळी विक्रमबाबा पाटणकर यांच्यासह शेतकऱ्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली. असता रस्तारोको शेतकऱ्यांसह विक्रमबाबा पाटणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बुधवारी रात्री केरानदीच्या खोऱ्यासह पाटण तालुक्यात झालेल्या ढगफुटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हे नुकसान आजपर्यंतच्या काळातील सर्वात मोठे नुकसान आहे. असे असताना प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी नेहमीप्रमाणे केवळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोणीही या नुकसानीची पाहणी केली नाही. अशावेळी सुस्त पडलेल्या राज्यकर्ते प्रशासनाच्या विरोधात शनिवारी सकाळी पाटण येथे नुकसानग्रस्त शेतकरी एकवटले व त्यांनी पाटण येथील केरा नदीच्या पुलावर जाऊन कराड – चिपळूण हा महामार्गावर रस्ता रोको केला. यावेळी बोलताना विक्रमबाबा पाटणकर म्हणाले. आता पंचनामे करण्याचे केवळ नाटक नको.
शेतकऱ्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय उरलेला नाही. या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कर्जे काढून पेरणी केली होती. ती वाया गेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी वाहून गेल्या आहेत. या संकटाचे उग्र रूप पाहून शेतकऱ्यांसमोर आत्महत्या शिवाय पर्याय उरलेला नाही. अशा परस्थितीत डोळे जाकून झोपलेल्या शासनाने वेळीच जागे होऊन शेतकऱ्यांना तातडीची पहिली मदत द्या. अशी आग्रही भूमिका विक्रमबाबा पाटणकर यांनी घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.

पोलिसांच्या कारवाई नंतर बोलताना विक्रमबाबा म्हणाले झालेल्या प्रचंड नुकसानीसाठी शेतकऱ्यांना न्याय मागण्यांसाठी प्रशासनाने केलेली दिरंगाई यामुळे हवालदिल झालेला शेतकरी यांना न्यायमागणीसाठी केलेल्या शेतकऱ्यांच्यावर राज्यशासनाने व लोकप्रतिनिधीनी पोलिसांच्या कर्वे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले या असल्या गुन्हेगारीला आणि कारवाईला आम्ही दाद देत नाही. आम्हाला जो पर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही हा संघर्ष पुढे चालू ठेवणार आहे. दहा दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीतर यापुढे शेतकरी सातारला जाऊन राष्ट्रीय महामार्ग आडवणार व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करु वेळ प्रसंगी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन तिथे ठिय्या आंदोलन करणार. असल्याचे सांगून पोलिसांच्या धमकीला धडपशाहीला आम्ही जुमानणार नाही. शासन सत्तेचा दुर उपयोग करून सामान्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार असेल तर त्या शासनाला आम्ही योग्य तो धडा शिकवू. असे विक्रमबाबा पाटणकर यांनी सांगितले.

सायरन वाजवत मिरविणाऱ्या भोंगाबाबांचा निषेध- विक्रमबाबा पाटणकर
शेतकऱ्यांच्या छताडावर बसून शेतकऱ्यांना जबरदस्तीने पोलिसांच्या करवी तुरुंगात डांबून नुसता सायरन वाजवत जाणारे भोंगाबाबा भोंगा वाजवत गेले. पण आंदोलन ठिकाणी शेतकऱ्यांना येवून त्यांचे काय गाराने असे विचारण्याची त्यांची दानत झाली नाही. अशा भोंगाबाबा लोकप्रतिनिधींचा आम्ही निषेध करतो.
तसेच राज्यमंत्र्यांचे ऐकून शेतकऱ्यांचे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस निरीक्षक चौंखडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करत असल्याचे विक्रमबाबा यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular