पाटण:- (शंकर मोहिते)- ऐकीकडे वन्यजीव, वनविभाग आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त “जंगल वाचवा.. वन्यजीव वाचवा” अशा घोषणा देत आसताना दुसरीकडे मात्र कोयना विभागात जंगली गवा रेड्या दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसून लावणीला आलेल्या भात पिकाची नासाडी करतानाचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला. कष्टाने लावलेल्या पिकाची शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर अशी जंगली प्राण्यांकडून नुकसान होत आसताना पहाताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू ढहळल्याशिवाय रहात नाही. मळणी धरावी असा गवारेडा भात पिकाच्या शेतात गोलगोल फिरतानाचा हा व्हिडीओ वन्यजीव, वनविभागाच्या डोळ्यात अंजन घालणाराच ठरला आहे. जंगली प्राण्यांच्या या उपद्रव्यावर मात्र वन्यजीव व वनविभागाकडून कोणतीच उपाययोजना अथवा कारवाई होत नाही हे मोठे दुर्दैव आहे.
पाटण तालुका हा डोंगरी व जंगली तालुका असल्याने या तालुक्यात जंगली प्राण्यांचे मोठे उपद्व्याप वाढले आहेत. नुकत्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होऊन पिके जमनीवर आली आहेत. जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी या उपाययोजनांचा अडथळा दुर करुन गवा रेडे, रान डुक्करे, माकडे, आदी जंगली प्राणी शेतात धुमाकूळ घातल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. हल्ली दिवसाचा देखील या प्राण्यांचा वावर शेतात वाढला आहे.
याबरोबर बिबट्या, अस्वल सारख्या हिंस्र प्राण्यांचा देखील वावर मानवी वस्ती जवळ वाढला असून या प्राण्यांचे हल्ले शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरां बरोबर शेतकऱ्यांच्यावर देखील वाढले आहेत. याबाबत अनेक वेळा शेतकऱ्यांनी वन्यजीव, वनविभागाकडे तक्रारी दिल्या आहेत. तरी देखील वन्यजीव, वनविभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. शेतकऱ्यांना केवळ कागदी घोडे नाचवायला लावून नुकसानीची तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या तोंडावर मारून शेतकऱ्यांना अपमानित केले जात आहे. जंगली प्राण्यापासून होणाऱ्या नुकसानीला सामोरे जाताना शासनाकडून देखील नुकसानीची पुरेशी मदत शेतकऱ्यांना मिळत नाही. हे दुर्देव्य आहे.
शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर गवा रेडयाकडून शेताची नासाडी ; वन्यजीव, वनविभाग अजून किती अंत पहाणार
RELATED ARTICLES