Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाटण तालुका अध्यक्षपदी पत्रकार उमेश सुतार

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाटण तालुका अध्यक्षपदी पत्रकार उमेश सुतार

कराड: मुंबई महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाटण तालुका अध्यक्षपदी चाफळचे पत्रकार उमेश सुतार यांची निवड करण्यात आली आहे. राज्य संघटक संजय भोकरे व राज्याध्यक्ष राजा माने यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
उमेश सुतार हे गेली 20 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या कार्याचा गौरव अनेक सामाजिक संस्थांनी वेळोवेळी केलेला आहे. त्यांना यापूर्वी आदर्श पत्रकार, कवीरत्न, आदर्श ग्रंथपाल, समाजगौरव, आदर्श उपसंपादक, महात्मा गांधी तंटामुक्त शांतता पुरस्कार, कमल आई काव्य पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. नुकताच जानेवारी 2019 मध्ये आदर्श फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा नॅशनल युनिटी अ‍ॅवॉर्डनेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
नुकतीच त्यांचेवर मुंबई महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पाटण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. या निवडीनंतर बोलताना सुतार यांनी संघटनेच्या ध्येय धोरणांना अधीन राहून आपल्या कार्यक्षेत्रात पत्रकारांची संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.
या निवडीबद्दल त्यांचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, सातारा ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे व विविध राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular