Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीमल्हारपेठ प्राथमिक शाळा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मल्हारपेठ प्राथमिक शाळा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मल्हारपेठ : येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. सरपंच धनश्री कदम व पाटण पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर यांचे प्रमुख उपस्थिती होती.
मराठी माध्यमातून शिक्षण घेणारी मुलेमुली ही सर्वच क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करतात ही बाब कौतुक करण्यासारखीच आहे. याची सदैव जाणीव ठेवून प्राथमिक शाळांना सर्वांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन पाटण पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर यांनी केले.
सरपंच धनश्री कदम यांनी सांगितले की, शालेय जीवनात शिक्षण घेताना शैक्षणिक गुणवत्ता बरोबरच मुलांच्या अंगी असणार्‍या विविध कला क्रीडा क्षेत्रातील गुणांचा ही विकास होणे व मुलांचे व्यक्तिमत्त्व सर्व गुण संपन्न व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच मुलामुलींच्या कला गुणांचे कौतुक करून त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन द्यावे असेही धनश्री कदम यांनी सांगितले.
यावेळी विविध गुण दर्शन कार्यक्रमही झाला. यावेळी केंद्रप्रमुख संपतराव चव्हाण, भाग्यश्री हिरवे, संगिता वाघ, अवधूत कांबळे आदी मान्यवर हजर होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सारिका पवार, उपाध्यक्ष महेश कदम, मुख्य अध्यपिका स्वाती कदम यांनी स्वागत केले. अमोल जाधव यांनी प्रास्ताविक, सरिता फले यांनी सूत्रसंचालन तर योगेश हिरवे, चंद्रकांत भिसे यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular