पाटण: 350 वर्षापूर्वी श्री. समर्थ रामदास स्वामी यांनी श्रीमंत सरदार पाटणकर घराण्याला भेट दिलेल्या पंचधातू श्री पट्टाभिरामाच्या मुर्ती ला महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिरातील पंचगंगा पवित्र जलाने श्री रामनवमीला जलाभिषेक घालण्यात आला. हे पंचगंगा पवित्र जल महाबळेश्वर ते पाटण पायी श्रीराम कावडयात्रेने आणन्यात आले. या कावडयात्रेचे पाटण येथे ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले.
350 वर्षापुर्वी श्री. समर्थ रामदास स्वामी यांनी श्रीमंत सरदार पाटणकर घराण्याला पंचधातू श्री पट्टाभिरामाची मुर्ती भेट दिली होती. समर्थांच्या स्मरणार्थ पाटणकर घराण्याने त्यांच्या वाड्यात श्री रामाची प्राणप्रतिष्ठापना करून भव्य असे श्रीराम मंदिर उभारले. समर्थांनी भेट दिलेली श्री पट्टाभिरामाची मुर्ती पाटणकर वाड्यातील या श्रीराम मंदिरात आज हि पहायला मिळते. 350 वर्षांपासून या राममंदिरात श्रीराम जन्मोत्सव (श्रीरामनवमी) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या इतिहासीक पाश्वभूमीवर चालू वर्षांपासून पाटण येथील तरुणांनी महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिरातील पंचगंगा पवित्र जल घेऊन महाबळेश्वर ते पाटण पायी श्रीराम कावड यात्रा सूरु केली. गेली पाच दिवस महाबळेश्वर पासुन पायी चाललेल्या या श्रीराम कावड यात्रेचे रामनवमी दिवशी सकाळी पाटण येथे आगमन झाले. केरा पुलानजिक या श्री रामकावड यात्रेचे पाटण नगरपंचायतीने स्वागत केले. तेथून मिरवणूकीने श्रीराम कावडयात्रा श्रीराम मंदिरात आली असता तिथे हि कावड यात्रेचे भव्य स्वागत करुन महाबळेश्वर येथील पंचगंगा पवित्र जलाने पंचधातू श्री पट्टाभिरामाचा अभिषेक करण्यात आला.
या पायी श्रीराम कावडयात्रेत पाटण येथील विजयेंद्र पाटणकर, विनय जाधव, बकाजीराव निकम, अशोक पाटणकर, रणजित साळुंखे, सूग्राव कोळी, आनंदा कोळी, सुरज कुंभार, महेश पवार या कावडीया श्रीराम भक्तांनी सहभाग घेतला.
श्रीरामनवमीला महाबळेश्वरच्या पंचगंगेने पाटण येथील श्रीपट्टाभिरामाचा अभिषेक
RELATED ARTICLES