पाटण: पाटण सारख्या ग्रामीण भागात एन.एस.सी स्पोर्ट्स क्लब सुरू झाल्याने मुलांना क्रिडा क्षेत्रातील एक चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. कमी कालावधीत या स्पोर्ट्स क्लब चे विद्यार्थी जिल्हा आणि राज्य पातळीवर पोहोचले असल्याने या विद्यार्थ्यांना घडविणारे क्रिडा शिक्षकांच्या मेहनतीला यश येत आहे.
पालकांच्या आग्रहखातर या स्पोर्ट्स क्लबने उन्हाळी सुट्टीतील समर कँप सुरु करून मुलांना सुट्टीतील आनंद व्दिगुणीत करून देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद असून सोशल मीडियावर हरवलेल्या मुलांना पालक एन.एस.सी. स्पोर्ट्स क्लब वर दाखल करत आहेत.
आजची बालवयातील व तरुण पिढी हि मोबाईल च्या हरी जात असल्याचे आढळून येते आहे. यामुळे त्यांचा शारीरिक व मानसिक विकास खुंटला आहे. मोबाईल च्या दुनियेतुन बाहेर काढून या मुलांना मैदानी खेळांची सवय लावणे हि पालकांची जबाबदारी आहे. मुल मैदानात उतरली तरच त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होऊ शकतो. पाटण सारख्या ग्रामीण भागात एन.एस.सी. स्पोर्ट्स क्लब सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रिडा कौशल्य दाखविण्याचे व्यासपीठ खुले झाले आहे.
मुंबई- पुणे पाठोपाठ पाटण येथे सुरु झालेल्या या स्पोर्ट्स क्लब मधे राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत खेळाडू घडावेत अशी अशा समर कँप उदघाटन प्रसंगी आलेले मान्यवर पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक सचिन कुंभार, पाटण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शंकर मोहिते यांनी व्यक्त केली.
यावेळी स्पोर्ट्स क्लबचे समन्वयक चंद्रहार निकम, मॅनेजर चंद्रगुप्त निकम, प्रशिक्षक शिरीष देशमुख, विकास भोसले, पवन खैरमोडे, अक्षय गुजर, रुपेश पवार यांची उपस्थिती होती. प्रशिक्षक शिरीष देशमुख यांनी प्रस्तावना करुन सर्वांचे स्वागत केले. तर शेवटी मैनेजर चंद्रगुप्त निकम यांनी आभार मानले. यावेळी क्लबचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पोर्ट्स क्लब समर कॅम्पला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES