पाटण:- सोशल मीडियाच्या युगात वाढदिवस साजरा करण्याचे फैड जोमात सुरु असताना. प्रत्येक ग्रुप वर एकाचा तरी दररोज वाढदिवस साजरा होत असलेला दिसतोच. मग तो कोणाचा वैयक्तिक वाढदिवस, कोणाच्या मुलाचा वाढदिवस, कोणाच्या लग्नाचा वाढदिवस थ्री स्टार, फायू स्टार होटेल वर कोणाचा वाढदिवस रिसॉर्ट, ढाब्यावर, तर कोणाचा गावातल्या हमचौकात तलवारीने केक कापताना, तर कोणाचा बैनरबाजी, फोटोबाजी स्वत:ची प्रसिध्दी स्वत: करुन वाढदिवस साजरा केलेला हमखास दिसतोच. हा सगळा डामडौल प्रसिद्धी देखील बाजूला सारून रणसिंगवाडी ता. खटाव सद्या रा. पुणे येथील दत्तात्रय आणि पल्लवी जाधव या विवाहित दापत्त्याने लग्नाचा सहावा वाढदिवस ऊसतोड कामगारांच्यां मुलांसोबत त्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे आणि खाऊ वाटप करून साजरा केला. त्यांच्या या सामाजिक भावनेतील जिव्हाळ्याच्या उपक्रमाने या मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
काही दिवसांपूर्वी किसनवीर साखर कारखान्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळेत सामाजिक कार्यकर्ते विशाल कांबळे यांचे व्याख्यान झाले. या मुलांच्या रांगेत गरीब आणि हुशार शिक्षणासाठी धडपडणारी पल्लवी नावाची चिमुरडी होती. तिच्या शैक्षणीक संघर्षाची एक पोस्ट सोशल मीडियावरील “जिना इसीका नाम है” या व्हाट्सएप ग्रुपवर विशाल कांबळे यांनी टाकली. हि पोस्ट दत्तात्रय आणि पल्लवी या जाधव विवाहित दापत्त्यांनी वाचली. असता. लग्नाचा सहावा वाढदिवस ऊसतोड कामगारांच्या मुलांसोबत करायचा असा निर्णय त्यांनी घेतला. तसा संपर्क करून त्यांनी विशाल कांबळे यांना सांगितले. आणि या जाधव विवाहित दापत्त्याने लग्नाचा सहावा वाढदिवस किसनवीर साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊसतोड कामगारांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या मुलांच्या व पालकांच्या सोबत साजरा केला. यावेळी या मुलांना दत्तात्रय-पल्लवी या जाधव दापत्त्याने त्यांच्या वैवाहिक जीवनावर खेळणाऱ्या “दक्ष” या चिमुरड्या च्या हस्ते शैक्षणिक साहित्य, कपडे आणि खाऊचे वाटप केले. या मुलांच्या सोबत साजरा झालेला लग्नाचा वाढदिवस दत्तात्रय-पल्लवी या जाधव विवाहित दापत्त्यांबरोबर ऊसतोड कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उर्जा आणि आनंद देऊन गेला. प्रतेकाच्या जन्माचा आणि लग्नाचा वाढदिवस प्रत्येक वर्षी येतच असतो. हे वाढदिवस साजरे करताना इतर डामडौल सामाजिक शांतता भंग होईल असे न करता गरीब विद्यार्थ्यांसाठी व समाजातील गरजू कुटुंबासाठी साजरे केले तर हा जिवणात मिळणारा वेगळा आनंद प्रतेकाला अनुभवता येईल.
सामाजिक भावनेतून ऊसतोड कामगारांच्या गरीब मुलांसोबत आमच्या लग्नाचा साजरा झलेला वाढदिवस आमच्या जिवणात नवीन उर्जा देऊन गेला. या मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ, कपड्यांचे वाटप करताना व त्यांच्या सोबत झाडाखाली बसून काही क्षण घालविताना या मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता. तो आनंद स्वतः अनुभवताना गरीब मुलांना वेगळ काही केल्याचा आनंद आम्हाला मिळाला. हा वाढदिवस आमच्या जिवणात देखील गरीब मुलांसाठी सतत काही चांगले करण्याची उर्जा देऊन गेला. अस दत्तात्रय आणि पल्लवी या जाधव दापत्त्याने यावेळी सांगितले. जाधव दापत्त्याबरोबर यावेळी विशाल कांबळे, हणुमंत कांबळे, आयुष कॉम्प्युटर सेंटर वडूथ संस्थापिका वर्षा साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.