Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीअतिरिक्त कारभारामुळे मी पाटणचा नाईट वॉचमन -: मुख्याधिकारी डांगे.

अतिरिक्त कारभारामुळे मी पाटणचा नाईट वॉचमन -: मुख्याधिकारी डांगे.

 

पाटण:- पाटण नगरपंचायतीचा माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. पाटणकडे पुर्णवेळ द्यायला मला वेळ मिळत नाही. गेल्या सहा महिन्या पासून पाटण नगरपंचायतीला पुर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा अशी माझी शासनाकडे लेखी मागणी आहे. पाटणच्या विकासाच्या बाबतीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना विचारा. मी फक्त पाटण नगरपंचायतीचा नाईट वॉचमन असुन क्रिकेट टीममधील राखीव बारावा खेळाडू आहे. मला पाटण नगरपंचायतीचे काहीऐक देणे-घेणे नाही असे स्पष्ट शब्दात पाटणचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.

पाटण नगरपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार हाती घेतल्यापासून मुख्याधिकारी यशवंत डांगे हे पहिल्यांदाच पाटणच्या पत्रकारांना नगरपंचायत कार्यालयात भेटले. यावेळी पत्रकारांनी डांगे यांना पाटणच्या विकासाबाबत अनेक प्रश्न विचारले असता मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी मूळ प्रश्नांना बगल देत सर्व प्रश्नांची नकारात्मक उत्तरे दिली. व वरील धक्कादायक विदाने केली. यावेळी पाटणच्या नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

पाटणनगरीचा विकास हा येथील जनतेने निवडून दिलेल्या पदाधिकारी व नगरसेवकांनी पहावयाचा आहे. येथील प्रशासकीय कामकाज थांबू नये म्हणून मी आठवड्यातून एकदा येतो ही मेहेरबानी समजा. असे मुख्याधिकारी डांगे पत्रकारांना सांगत आसताना नगराध्यक्ष सौ. सुषमा महाजन तेथे आल्या असता मुख्याधिकारी यांनी प्रोटोकॉल पाळायला हवा होता तो पाळला गेला नाही. याबाबतीत हि पत्रकारांनी डांगे यांना छेडले असता मी दोन वर्षे सब इनिसफैक्टर आणि सतरा वर्षे मुख्याधिकारी म्हणून काम करतोय. प्रोटोकॉल काय असतो तो तुम्ही मला सांगू नका. असे उत्तर त्यांनी दिले. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना नगरपंचायतीच्या कामकाजाबाबतीत विचारात घेतले जात नाही. त्यांच्या परस्पर नगरपंचायतीचे अनेक ठराव विकासकामांची टेंडर कशी काडली जातात ? असे विचारले असता त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळले. तर स्वच्छता अभियाना अंतर्गत पाटण शहरातील स्वच्छता करण्यास दिलेले कौंट्रक्ट शहरातून गाड्या फिरवण्यापुरते आहे का? का स्वच्छता करून कचरा गोळा करण्यासाठी? पाटण शहरात ठिक-ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात. नगरपंचायतीच्या कार्यालयात बसल्यावर देखील जुना स्टैंड परिसरातला पसरलेला कचरा देखील दिसतोच. मग स्वच्छता कौंट्रक्ट ठेकेदाराला महिन्याला आठ लाख रुपये देण्यापुरते आहे का? स्वच्छता कौंट्रक्ट देण्याअगोदर स्वच्छतावर वर्षाला सहा लाख रुपये खर्च येत होता. शहरातील स्वच्छता होत नसेल तर मग महिन्याला आठ लाख रुपये खर्च कशासाठी? या सर्व प्रश्नावर मुख्याधिकारी निरत्तोरच होते.

गावातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांवर, पिण्याच्या पाण्याच्या नळ योजनांच्या दुरूस्तीच्या कामावर मुख्याधिकारी त्यांच्या कार्यकाळात कधीच फिरकले नाहीत. माझ्याकडे ज्या गावचा पूर्णवेळ कारभार आहे त्या नगरपंचायतीच्या विकासाकडेच लक्ष देणे माझ्यावर बंधनकारक आहे. ज्या नगरपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे आहे त्या नगरपंचायतीत मी दररोज उपस्थित असलेच पाहिजे असे नाही. मी आठवड्यातून एकवेळ यायचे, येथे कितीवेळ थांबायचे, कार्यालयात यायचे की नाही हा माझा प्रश्न आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या नगरपंचायतीस पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा अशी पत्रे मी गेल्या सहा महिन्यात दोन-तीन वेळा दिलेली आहेत. मात्र शासन याची दखल घेत नसल्याने मला येथे येण्यास भाग पडत आहे.

जेथे पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहोत त्या नगरपंचायतीचा कायापालट करण्याचे माझे काम आहे. पाटण नगरपंचायतीचा अतिरिक्त पद्‌भार माझ्याकडे असून कोणत्या कामावर मी जायचे अथवा न जायचे हे मी ठरवणार आहे. मी विकासकामांना भेटी दिल्याच पाहिजेत असे माझ्यावर बंधन नाही. पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यावर ही जबाबदारी असून त्यांनी ती पार पाडली पाहिजे, असेही प्रश्नांना उत्तर देताना शेवटी डांगे म्हणाले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular