पाटण : – पाटण नगरपंचायतीच्या अध्यक्ष सौ. सुषमा महाजन व उपाध्यक्ष दिपक शिंदे यांच्या पदाचा पहिला अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत आला असताना पुढील अडीच वर्षाच्या नूतन नगराध्यक्ष पदासाठी सोमवार दि. १० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय जयवंत चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. संजय चव्हाण यांनी भरलेल्या चार अर्जांची छाननी करण्यात आली. असता चारीही अर्ज वैध ठरविण्यात आले असल्याची माहिती नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारी सौ. संजीवनी दळवी यांनी दिली. तर उपनगराध्यक्ष पदाची निवड दि. १४ जुन रोजी होणार असून यापदावर महिला नगरसेविका ची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत.
पाटण नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष पदासाठी सोमवार दि. १० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय जयवंत चव्हाण या एकाच उमेदवाराचे ४ अर्ज दाखल करण्यात आले. दुपारी या अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये चारीही अर्ज प्रभारी मुख्याधिकारी यांनी वैध ठरविले. दरम्यान, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला असून ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी शुक्रवार दि. १४ रोजी निवडणूक होणार असून ही प्रक्रियादेखील बिनविरोध पार पडण्याची शक्यता आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी महिला नगरसेविका ची निवड होण्याची चिन्हे असून यावर कोणाची वर्णी लागणार याकडे संगळ्याचे लक्ष राहिले आहे.
पाटण नगरपंचायतीच्या सधाच्या नगराध्यक्षदी विराजमान असलेल्या सौ. सुषमा महाजन यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत आल्याने नगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार सोमवार दि. १९ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत नगराध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची वेळ होती. या दरम्यान युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, विद्यमान नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, नगरसेविका सौ. रश्मी राऊत, हरिभाऊ सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत संजय चव्हाण यांचे नगराध्यक्षपदासाठीचे ४ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर दुपारी २ नंतर अर्जांची छाननी केल्यावर संजय चव्हाण यांचे चारीही अर्ज वैध ठरविण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याने पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी संजय चव्हाण यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे. याची औपचारिकता बाकी असून नगराध्यक्ष निवडीची घोषणा प्रत्यक्षात शुक्रवार दि. १४ रोजी करण्यात येणार आहे. तद्नंतर त्याच दिवशी म्हणजे गुरूवारी उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड केली जाणार आहे. आता उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याची उत्सूकता पाटणशहरवासियांना लागली आहे.
नगराध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण पाटण शहराचे लक्ष लागले होते. त्यातच नगराध्यक्षपदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. काही केले तरी मी माघार घेणार नाही अशा वल्गनाही काही नगरसेवकांनी बोलताना केल्या होत्या. मात्र नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या नाट्यमय घडामोंडीकडे पाहता नेत्यांनी दिलेला शब्द हाच अंतिम सर्व नगरसेवकांनी मान्य केल्याचे दिसून आले. आता उपनगराध्यक्ष पदावर नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले असून उपनगराध्यक्ष पद मिळण्यासाठी नगरसेवकांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. मात्र नगरपंचायतीत महिला नगरसेविकांची संख्या देखील निम्मी असून उपनगराध्यक्ष पदावर महिला नगरसेविकाची निवड होण्याची शक्यता आहे. यावर आता कोणाची वर्णी लागणार याकडे संगळ्याचे लक्ष लागले आहे.