Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीशिक्षक हा जन्मांतरीचा आद्यावत गुरु असतो :- रमेश चव्हाण ; माने-देशमुख पाटणचे...

शिक्षक हा जन्मांतरीचा आद्यावत गुरु असतो :- रमेश चव्हाण ; माने-देशमुख पाटणचे मुख्याध्यापक सर्जेराव चव्हाण यांच्या सेवानिवृत्त समारंभ उत्साहात.

 

पाटण:- कठीण परस्थितीतुन स्वतः चे शिक्षण पुर्ण करून विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत असताना सामाजिक भावनेतून केलेले कार्य गेल्या ३६ वर्षातील विद्यार्थी विसरलेला नाही. हेच या जिवणाचे फलित आहे. शिक्षक हा जन्मांतरीचा आद्यावत गुरु असतो. तो कधीही निवृत्त होत नाही. आज जिल्ह्यातील नामवंत शाळांच्या यादीमधे माने देशमुख चे नाव पहिल्या दहा मध्ये घेतले जाते. कारण येथील व्यवस्थापन चांगले आहे. शिक्षक हे विद्यार्थी प्रिय आहेत. माने देशमुख विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख चढता आहे. कारण मुख्याध्यापक सर्जेराव चव्हाण सरांसारखे शिक्षक आज या शाळेवरती कार्यरत आहेत. चव्हाण सर हे आपल्या कार्याने व कतृत्वाने प्रसिध्द असलेला मानूस आहे. सेवानिवृत्त होत असताना त्यांचा आदर्श इतर मुख्याध्यापकांनी घ्यावा. असे गौरवउदगार सातारा जिल्हा परिषदेचे उप शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी माने-देशमुख पाटण येथे मुख्याध्यापक सर्जेराव चव्हाण यांच्या सेवानिवृत्त समारंभ प्रसंगी काढले.

यावेळी कोयना शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, गटशिक्षण अधिकारी नितीन जगताप, पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष संजय चव्हाण, कोयना शि. संस्थेचे सदस्य संजीव चव्हाण, डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. सिमा चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिति होते.

यावेळी बोलताना कोयना शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर म्हणाले शिक्षक हा विद्यार्थी घडवत असतो. माने देशमुख च्या जडण-घडणी मध्ये चव्हाण सरांचा फार मोलाचा वाटा आहे. त्यांनी केलेले कार्य हे माने देशमुख विद्यालयाच्या परिसरातील या भिंती बघूनचं समजत आहे. कारण या भिंती फक्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या बोर्डनी सजलेल्या आहेत. चव्हाण सर हे अतिशय प्रामाणिक व मेहनती शिक्षक आहेत. माने देशमुख विद्यालयामद्ये चव्हाण सर आल्यापासून शाळा हिच स्वतः चे घर समजून काम करत होते. विद्याथ्यांना ते नेहमी आपलेसे वाटायचे कारण त्यांची शिस्त ही काटेकोर होती. ते बाहेरुन कित्ती ही कडक असले तरी मनाने मात्र फारचं प्रेमळ व विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. चव्हाण सर माने देशमुख वरती कार्यरत असताना आपली शाळा हेचं आपले कुटुंब आहे असे समजून आपला संपूर्ण दिवस ते शाळेमध्ये घालवत होते माने-देशमुख विद्यालयातील त्यांचा कार्यकाळ हा आदर्शवत ठरला आहे.

पाटण पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी नितीन जगताप यावेळी म्हणाले शिक्षक हा जन्मांतरीचा आद्यावत गुरु असतो. तो कधीही निवृत्त होत नाही. चव्हाण सरांचा आज सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आयोजित केला आहे परंतु ते सेवानिवृत्त व्हावे अशी आमची इच्छाचं नाही. कारणं इतका हुशार, अभ्यासू व तत्पर शिक्षक आज आमच्यामधून निवृत्त होतोय हे मनाला पटत नाही. त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम करताना माझी शाळा सर्वांत अव्वल कशी ठरेल यासाठी प्रयत्न केले. आज जिल्ह्यातील नामवंत शाळांच्या यादीमद्यू माने देशमुख चे नाव पहिल्या दहा मध्ये घेतले जाते. कारण येथील व्यवस्थापन चांगले आहे. शिक्षक हे विद्यार्थी प्रिय आहेत. असे त्यांनी सांगितले.

पालकांचे प्रतिनिधी म्हणून संजय इंगवले म्हणाले माने देशमुख विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख चढता आहे कारण चव्हाण सरांसारखे शिक्षक आज या शाळेवरती कार्यरत आहेत. चव्हाण सर हे आपल्या कार्याने व कतृत्वाने प्रसिध्द असलेला मानूस आहे. माझी शाळा कशी प्रगत ठरेल. माझा शाळेतील मुलांनी बहुगुण संपन्न व्हावी म्हणून ते सतत कार्यरत असत. आज त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित केला आहे. त्यांच्या आम्ही बद्दल किती आणि काय बोलावे हेच समजत नाही कारण समोर बसलेले सर्वजन व हे विद्यार्थी त्यांची शिक्षकाप्रती होणारी हळवी भाषणं हेचं त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. त्यांच्या सेवागौरव समारंभा निमित्ताने त्यांना आम्ही असे सांगू इच्छितो कि आपले समाजकार्य त्यांनी असेच चालू ठेवावे व अधून मधून शाळेला मार्गदर्शन ही करावे. त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा..

यावेळी संजीव चव्हाण, दिनकर माथने, सुरभी चव्हाण, आदी मान्यवर व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्याध्यापक सर्जेराव चव्हाण यांचा सहपत्नीक सौ. विजया चव्हाण यांच्यासह सेवापुर्ती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माने-देशमुख विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दिलीपराव संकपाळ, जालिंदर डोंगरे, डी.एस. मोरे, रामचंद्र पानस्कर, पर्यवेक्षक पंडीतराव गव्हाणे, मोहिते सर, यांच्यासह आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी कार्याध्यक्ष सपकाळ ए.एल.यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular