पाटण :- कराड – चिपळूण रस्ता रुंदीकरण नियोजन शून्य चालेल्या गच्याळ कामाच्या विरोधात संगमनगर धक्का येथे क्रांती ज्योती महिला संघटनेकडून भरपाऊसात महामार्ग रोखुन धरला. सर्वसामान्यांच्या जिवासाठी महिलांनी केलेल्या या आंदोलनात पुरुषांनी देखील सहभाग घेतला. रस्त्याचे काम पहात असलेल्या एल अँड टी. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून रस्त्यावर पडलेले खड्डे मुजविण्याचे अश्वासन दिल्यानंतर या महिलांनी आंदोलन मागे घेतले.
पाटण ते कोयनानगर रस्ता रूंदीकरणाच्या ढिसाळ कामामुळे महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, पसरलेले चिखलाचे साम्राज्य, हेळवाक पुलाची व महामार्गाची झालेली दुरवस्था याविरोधात क्रांती ज्योती महिला संघटनेकडून संगमनगर धक्का येथील रस्त्यावर भर पावसात बुधवारी रास्तारोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरला होता. यावेळी आंदोलकांनी कराड-चिपळूण महामार्ग काहीकाळ रोखून धरत जोरदार घोषणाबाजी केली. हेळवाक पुलासह विभागातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सबंधित कंपनीने तात्काळ सुरू करावे. अन्यथा काही बरेवाईट झाल्यास सबंधित कंपनी व बांधकाम विभाग यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. असा इशारा यावेळी सदस्य बबनराव कांबळे यांनी केली.
या मार्गाचे रुंदीकरणाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून कराड-चिपळूण मार्गावर पडलेले खड्डे मुजवण्याचे काम तात्काळ सुरू करत असल्याचे आश्वासन देत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तसे लेखी दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संगमनगर (धक्का) येथे कोयना पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात उपसभापती राजाभाऊ शेलार, पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, क्रांतिज्योती महिला संघटनेच्या अध्यक्षा मंगलताई माने, बाळासाहेब कदम, लहूराज कदम, सत्यजित शेलार, बापू देवळेकर, विकास जाधव, दाजी शेडगे, सुरेखा वाणी शांताबाई कांबळे, आशा तिवरे ,रमेश बल्लाळ, महेंदं कदम,जयराम कांबळे, फुलाबाई कदम यांच्यासह परिसरातील महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.