पाटण -: दि. १३ जुलै, २०१९ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, ढेबेवाडी या विद्यालयामार्फत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले, या विद्यालयाचे वैशिष्ट्य असे की,
या विद्यालयामध्ये येणारे विद्यार्थी हे अतिशय दुर्गम भागातुन येतात व त्यांची परिस्तिथीही अत्यंत नाजुक असल्याने त्यांना शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत अडथळे निर्माण होतात,
अशा विद्यार्थ्यांसाठी हे विद्यालय अतिशय उत्तम रीतीने कामगिरी करत आहे,
या विद्यालयाकडून शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या, पेन, एस. टी. बसचे पास अशा सर्व प्राथमिक गरजांची पुर्तता होत असल्यामुळे नागरिक उत्साहाची भावना व्यक्त करत आहेत व विद्यालयाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत तसेच सर्वच राजकीय व सामाजिक स्तरातून विद्यालयाचे व शिक्षकांचे भरभरुन कौतुक होत आहे.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या गणवेश वितरणाचे औचित्य साधून “मैत्री ग्रुप, मुंबई” (एक सेवाभावी नातं) या ग्रुप कडून श्री. रविंद्र आनंदा साळुंखे (पोकळेवाडी/कारळे) यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रविंद्र आनंदा साळुंखे व श्री. निवास शिवाजी सोनके (मोडकवाडी/जिंती) यांच्या सौजन्याने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले,
यावेळी ग्रुपचे अध्यक्ष कु. कृष्णा साळुंखे, सदस्य कु. कृष्णा यादव तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
ग्रुपच्या या कामगिरीबद्दल मुख्याध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी ग्रुपचे आभारही मानले व कौतुकही केले तसेच ग्रुपच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.