पाटण:- पाटण शहरात माशा आणि डासांचा पाद्रुरभाव मोठ्या प्रमाणात वाढला असून माशांचा घोंघाटामुळे नागरिक हैराण झाल्याचे चित्र दिसत आहे. या माशा पाटण शहरातील प्रत्येक घरा-घरात, गल्ली – बोळात, साठलेले सांडपाणी, नाले – गटर, कचऱ्याचे ढिग, हौटेल, हौसस्पिटल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात आडळून येत आहेत. माशा व डासांचा वाढलेल्या पाद्रुरभावामुळे पाटण शहरात साथीचे रोग पसरण्याची भिती नागरिक व्यक्त करत आहेत. पाटण नगरपंचायतीने वेळीच शहरात सर्वत्र औषध फवारणी करुन माशा व डासांचा वाढलेला पाद्रुरभाव वेळीच नियंत्रणात आणावा अशी मागणी नागरिकिंच्यातून होत आहे.
पाऊसाळा सुरु झाल्यापासून पाटण शहरात कधी नव्हे चालू वर्षी मोठ्या प्रमाणावर डास आणि माशांचा पाद्रुरभाव वाढलेला दिसत आहे. पाटण नगरपंचायतीचा प्रत्येक प्रभागात दररोज स्वच्छतेचा नारा असला तरी ठिकठिकाणी बारीक सारीक कचऱ्याचे ढिग आढळून येत आहेत. पाऊसाळ्यात उघड्यावरचा कचरा ओला झाला की या कचऱ्यावर डास आणि माशांचे प्रमाण वाढत आहे. तसेच अनेक वार्डात नाले सफाई नसल्यामुळे येथेही डास आणि माशांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या माशा आणि डासांचा पाद्रुरभाव घरा – घरात, गल्ली – बोळात, हौटेल, हौसस्पिटल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. माशांच्या या पाद्रुरभावा पासून मुक्तता घेण्यासाठी नागरिक, हौटेल व्यवसायकांनी ठिकठिकाणी प्लास्टिक पिशव्या पाण्यांनी भरून त्यात १ रुपयेची नानी टाकून आपल्या घरात व्यवसायाठिकाणी, टांगती ठेवली आहेत. आता हि अंधश्रद्धा की उपाययोजना त्यांचे त्यांनाच ठाऊक.
माशांच्या व डासांच्या वाढलेल्या पाद्रुरभाव व घोघांटामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या वाढलेल्या माशा व डासांमुळे साथीचे रोग पसरण्याची भिती देखील नागरिकांच्यात असुन वेळीच पाटण नगरपंचायतीने शहरात सगळीकडे औषध फवारणी करावी. तसेच प्रत्येक कुटुंबाला किटकनाशक पावडरची पैकेट वाटप करावीत जेणेकरून हि किटकनाशक पावडर घराच्या आवती-भवती ओला कचरा, साचलेले पाणी, घराचे सांडपाणी आदी ठिकाणी या पावडरचा त्यांना वापर करता येईल. तसेच दररोज स्वच्छतेचा नारा देत फिरणाऱ्या गाड्या व गाड्यावर असणारे स्वच्छता कर्मचारी यांना रस्त्यावर ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिग काढण्यास सांगावे.
गेल्याच महिन्यात पाटण नगरपंचायतीच्या नवीन नगराध्यक्ष पदी संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष पदी सचिन कुंभार यांची निवड झालेनंतर या नुतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन शहराच्या प्रत्येक प्रभागात काही दिवस स्वच्छता मोहीम राबवली होती. या स्वच्छता मोहिमेवर सर्व स्तरातून कौतुक होत होते. मात्र यानंतर काही दिवसातच पाऊसाला सुरुवात झाली. आणि नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी सुरू केलेली स्वच्छता मोहीम बारगळली.
स्वच्छतेसाठी नागरिकांची देखील जबाबदारी हवी.-: संजय चव्हाण.
*शहरातील नागरिकांनी देखील स्वच्छतेसाठी पुढे आले पाहिजे. आपण ज्या ठिकाणी राहतो वावरतो तो परिसर, घर, घरातील व घराच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवणे नागरिकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. घरातील कचरा एका ठिकाणी साठवून तो दररोज नगरपंचायतीच्या कचरा गाडीतच टाकावा. तसेच ओला कचरा ज्यादा प्रमाणात होणार नाही याची दक्षता देखील घ्यावी. घरातील सांडपाण्याची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावून ते डबक्याच्या स्वरूपात घराच्या आजुबाजुला साठणार नाही. याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. स्वच्छतेसाठी पाटण नगरपंचायत तत्पर असून शहरात वाढलेल्या माशा व डांस यासाठी किटकनाशक औषध फवारणी नगरपंचायती कडून केली जात आहे. असे नगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले.*