Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीपंधरा दिवसात अश्वासनांची पुर्तता करा. अन्यथा आंदोलन करणार ; मनसेचा एल अँड...

पंधरा दिवसात अश्वासनांची पुर्तता करा. अन्यथा आंदोलन करणार ; मनसेचा एल अँड टी ला इशारा.

पाटण:- कराड-चिपळूण महामार्ग रूंदीकरणाच्या कामातील दिरंगाईमुळे सर्वसामान्यांचे होणारे हाल व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित एल अँड टी कंपनीचे अधिकारी, मनसेचे पदाधिकारी आणि पाटणच्या सपोनि तृप्ती सोनवणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत सदर कंपनीकडून मनसे पदाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन देण्यात आले. याउपर येत्या पंधरा दिवसात आश्वासनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर व पदाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला.

या बैठकीस पाटणच्या सपोनि तृप्ती सोनवणे, एल अँड टी कंपनीचे अधिकारी विठ्ठल सावंत, विनायक कोरे, एस. एस. पोरे, महेश चाबुकस्वार तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. विकास पवार, दादा शिंगण, चंद्रकांत बामणे, संजय सत्रे, गोरख नारकर, राहूल संपकाळ, संभाजी चव्हाण, दयानंद नलवडे व इतर मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत रूंदीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात जमीन अधिगृहणाची जबाबदारी व अधिकार हे पूर्णत: राष्ट्रीय महामार्ग विभाग सातारा बांधकाम विभाग यांची असल्याने ही शासनाची जबाबदारी आहे. कराड-चिपळूण रस्त्यावरील होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी लवकरात लवकर एका बाजूचा रस्ता तयार करून देवू, उर्वरीत रस्त्याच्या डागडुजीचे काम देखील चालू आहे. नियोजित पिकअप शेड यांचा सर्वे झाला असून रोड पुर्णत्वाशिवाय त्या कामास सुरूवात करणे शक्य नाही. मात्र लोकांची व शाळकरी लहान मुलांची गैरसोय होवू नये म्हणून सदर ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास तात्पुरत्या स्वरूपात पिकअप शेड उभारू. त्यासाठी ग्रामपंचायतींनी पिकअप शेडसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन मनसेकडून करण्यात आले.

तसेच कराड-चिपळूण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास जागा उपलब्धतेनुसार रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचे काम करणार आहे. इलेक्ट्रीक पोल स्थलांतरीत करण्याचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी प्रलंबित असल्याने ते शक्य नाही. मात्र मागणी व आवश्यकतेनुसार धोकादायक इलेक्ट्रीक पोल शिफ्ट करण्यास कंपनी तयार आहे. तसेच रूंदीकरणाच्या कामावेळी ज्या ज्याठिकाणी नळपाणी पुरवठा पाईप फुटल्या आहेत तेथे नवीन पाईपलाईन टाकल्या असून म्होप्रे गावाजवळील पाईप बदलण्यासाठी ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. रूंदीकरण कामावेळी अपघात घडल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत त्याठिकाणी चोवीस तास कंपनीतर्फे ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देवू. तसेच अपघातस्थळी क्रेन उपलब्ध करून देवू, डायव्हरशन ठिकाणी सुरक्षिततेसंदर्भात उपाय म्हणून ठिकठिकाणी सूचना फलक, रिफ्लेक्टरण स्टिकर लावले असून त्यात सुधारणा करू. रस्त्याच्या साईडपट्ट्या मुरूमाने  भरण्याचे काम चालू आहे. मात्र अतिवृष्टीमुळे साईडपट्ट्या खडीकरण होत नाही. कंपनी वेळोवेळी दुरूस्तीबाबत सतक राहिल, असे आश्वासन एल. अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीत देण्यात आले.

यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना विविध मागण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिले. मात्र येत्या पंधरा दिवसात याबाबत सत्वर कार्यवाही सुरू व्हावी. अन्यथा पुन्हा मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही मनसेच्यावतीने बैठकीत देण्यात आला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular