पाटण :- कडकनाथ कोंबडी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कोठ्यावधीचा गंडा घालणाऱ्या महा रयत अँग्रो इंडिया प्रा. लि. च्या मालक संचालक यांच्या विरोधात सातारा जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या सूचनेनुसार पाटण पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. शेतकरी सचिन काशिनाथ शिर्के रा.नेरळे ता. पाटण यांनी महारयत अँग्रो चे सुधीर शंकर मोहिते, संदिप सुभाष मोहिते दोघे रा. इस्लामपूर, गणेश शेवाळे रा. बहे ता. कराड, वसीम इबुसे, दमाने मैडम, सागर खोत यांच्या विरोधात पाटण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून या तक्रारीत सातारा जिल्ह्यातील ७३ शेतकऱ्यांची मिळुन १ कोठी ४८ लाख २३ हजार ५१९ रुपये ला फसवणूक झाल्याचे म्हणले आहे. या कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणातील संशयित सहा नंबरचे आरोपी महाराष्ट्र राज्याचे क्रुषि राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रात तसेच गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थानसह विविध राज्यात पसरलेल्या महारयत अँग्रो प्रा. लि. कंपनीच्या सहा उप कंपन्यांच्या माध्यमातून कडकनाथ कोंबडी पालनासाठी शेतकऱ्यांना करोडो रुपये चा गंडा घातला. या प्रकरणी त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी स्थानिक पोलिस स्टेशनला धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेता शेतकऱ्यांना पिटाळून लावले होते. सातारा जिल्ह्यातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सातारा जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयात धाव घेतली होती. जिल्हा पो. प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी शेतकऱ्यांशी सहानुभूती पुर्वक चर्चा करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली. या प्रकरणी पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची जादा संख्या पाहता पाटण पोलिस स्टेशनला एकत्रित गुन्हा दाखल करुण घेण्याचे आदेश दिले.
सातारा जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या सांगण्यावरून गुरवारी सकाळी १०.३० वा. सुमारास कडकनाथ ग्रस्त शेतकरी सचिन काशिनाथ शिर्के रा. नेरळे ता. पाटण यांनी फसवणूक झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार दिली असून यामध्ये विष्णु भैरु मोरे रा. डोंगळेवाडी- १६, लाख ८५ हजार १४९, रुपये, अरविंद शहाजी डिगे रा. नाडोली- १लाख ८० हजार, जनार्दन रघुनाथ शिर्के रा. नेरळे- २ लाख ३५ हजार, निळकंठ तुकाराम पवार रा. बोंद्री- २ लाख ५७ हजार, फारुख निजाम मोकाशी रा. पाटण- १ लाख ६८ हजार, असिफ अकबर मोकाशी रा.पाटण- १ लाख ६८ हजार, रोहित आनंदा भोळे रा. पाटण- ३ लाख २५ हजार, मोहसीन मुल्ला सातारकर रा. पाटण- १ लाख ५६ हजार, योगेश दिनकर घाडगे रि. पाटण- १ लाख ८४ हजार, स्वाती योगेश घाडगे रा. पाटण- १ लाख ८३ हजार, मुसा गुलाब सातारकर रा.पाटण- १ लाख ६१ हजार, किसन दत्तू देसाई रा. मुळगाव- १ लाख ५ हजार, प्रकाश धोंडीराम संकपाळ रा. सुरुल- ४ लाख ७५ हजार, शामराव जयराम कदम रा. नेरळे- २ लाख ७० हजार, अनिल खाशाबा आर्डे रा. पाटण- १ लाख ८३ हजार, कोमल अनिल आर्डे रा. पाटण- १ लाख ८३ हजार, बबन बाबुराव सांळुखे रा. मेष्टेवाडी- १ लाख ७० हजार, सागर संजय जाधव रा. सोनाईचीवाडी- ४ लाख ९० हजार, सचिन दत्तात्रय पवार रा.नावडी- २ लाख ९० हजार, सागर सर्जेराव माळी रा. सोनाईचीवाडी- २ लाख ९५ हजार, तानाजी खाशाबा लुगडे रा. लुगडेवाडी- १ लाख ५ हजार, अक्षयकुमार सतिश देसाई रा. पाटण- २ लाख रुपये, अशोक बाळू शिर्के रा. नाटोशी- १ लाख ७० हजार, आबासो नारायण शिंदे रा. कुसरुंड- १ लाख २० हजार, सुनील बबन जाधव रा. मोरगिरी- २ लाख ४५ हजार, तानाजी महिपती शिंदे रा. कुसरुंड- २लाख ६१ हजार, नंदा शिवाजी पवार रा. वेखंडवाडी- ४ लाख रूपये, नितीन पोपटराव चव्हाण रा. तारळे- १ लाख ५५ हजार, विशाल बाळकृष्ण कोळी रा. तारळे-३ लाख ८० हजार, विलास रामचंद्र कदम रा. म्हावशी- २ लाख ५४ हजार, योगेश रमेश कदम रा. काठी- ३ लाख ५ हजार, सतिश रामचंद्र जाधव रा. मल्हारपेठ- २ लाख ३३ हजार हे सर्व शेतकरी पाटण तालुक्यातील आहेत.
तर सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकरी सुनील गणपती नायकवडी रा. मोतीबाग- ४६ हजार, विलास आत्माराम नायकवडी रा. शहाबाग – २ लाख रूपये, रुपक हणमंत शेवते रा. शहाबाग – ७ लाख २० हजार, अमित अनंत ननवरे रा. बावधन- २ लाख ३ हजार, मयुर सुनील ननवरे रा. मोतीबाग- ६० हजार, अमोल सदाशिव जमदाडे रा. शांतीनगर- १ लाख, संदेश शंकर जमदाडे रा. शांतीनगर- १ लाख ३३ हजार, अरुण रामचंद्र गायकवाड रा. ओझर्डे- १ लाख २० हजार, जय क्रुष्णा ननावरे रा. कवटे- १ लाख रूपये, हणमंत अंकुश शिर्के रा. अम्रुतवाडी- २ लाख ५० हजार, हे शेतकरी वाई तालुक्यातील आहेत.
तर भिमराव क्रुष्णा गुजर- २ लाख ५० हजार, दत्तात्रय भीमराव गुजर – २ लाख ५० हजार, प्रविण भिमराव गुजर- २ लाख ५० हजार, सर्व रा. पानस, सनी चंद्रकांत धुमाळ- १लाख ५ हजार, चेतन सर्जेराव गायकवाड- १लाख ३३ हजार दोघे रा. सरताळे, वशीम शौखत डांगे रा. कुडाळ- १ लाख ३३ हजार, अभिजित रमेश तरडे रा. बामणोली – ५० हजार, हणमंत अनंत पवार रा. महिगाव- ७५ हजार, महेश हणमंत महामुलकर रा महामुलकरवाडी- ७५ हजार, संतोष मारुती भिल्लारे रा भालेवाडी- २ लाख ५० हजार, सतिश लक्ष्मण पवार रा. भालेवाडी- २ लाख ५० हजार, नलिनी राजाराम दळवी रा. म्हातेमेटा- १ लाख रुपये, रमेश मारुती भिल्लारे रा.आलेवाडी- २ लाख ५० हजार, हे शेतकरी जावली तालुक्यातील आहेत.
सुभाष बाबासो चव्हाण- रा. ऐकंबे- ५० हजार, दीपक शिवराम बर्गे रा. सातारा – ५० हजार, अरविंद अनंदराव महाडिक रा. नांदगिरी – कोरेगाव- ७५ हजार, संदिप बाळू शेडगे रा. निगडी- सातारा-१ लाख २० हजार, अजिंक्य एकनाथ पुंडावळे रा. खिरोली-कोरेगाव- २लाख १० हजार, शरद विश्वनाथ मगर रा वांजोली – खटाव- ७५ हजार, संदिप विश्वनाथ मगर रा. वांजोली-७५ हजार, गणेश मारुती माने रा. जामगाव-खटाव – २० हजार, सुधीर दिनकर गोडसे रा.- शिरंबे-कोरेगाव-१ लाख २० हजार, सुर्यकांत शंकर चव्हाण रा. महागाव- सातारा- ५० हजार रुपये, अरविंद दिनकर जीमन- ७५ हजार रुपये, आकाश अशोक जिमन – ७५ हजार रुपये, सचिन विष्णु पिंपळे- ७५ हजार रुपये, संदिप विष्णु पिंपळे- ७५ हजार रुपये, लखन सूर्यकांत पिंपळे- ७५ हजार रुपये, तेजस चंद्रकांत पिंपळे – १ लाख २५ हजार रुपये, सर्व रा. कासारगाव, नितीन यशवंत वांगडे रा. निडळ – सातारा- ७५ हजार रुपये हे सर्व शेतकरी ता. सातारा जिल्हा सातारा येथील असुन यांची एकुण – १ कोठी ४८ लाख २३ हजार ५१९ रुपये ला फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हणले आहे. या कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी अधिक तपास पाटण पोलिस स्टेशन च्या प्रभारी पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.