पाटण:- पाटणमधील सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकुमार लक्ष्मण कांबळे व शिक्षक डॉ. श्रीधरपंत दत्तात्रय सवाखंडे यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी उत्तर ऑस्ट्रेलिया यांच्यामार्फत थायलंड बॅंकाक येथे पीएचडी प्रदान करण्यात आली. याबद्दल त्यांचा पाटण येथील समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टमार्फत बुधवार दि. 2 रोजी सकाळी 10 वाजता श्रीमंत रणजितसिंह पाटणकर हॉलमध्ये भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते आणि स्टेट बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा मुंबईचे सेवानिवृत्त अधिकारी आत्माराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास बदलापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष, गटनेते श्रीधर पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्ही. डी. सवाखंडे, पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संजय चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमास पाटणसह पंचक्रोशीतील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नितीन पिसाळ यांनी केले आहे.