Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसुंदरगडावर विजयादशमी दसरा उत्साहात साजरा.

सुंदरगडावर विजयादशमी दसरा उत्साहात साजरा.

 

पाटण :- पाटण महालातील प्रमुख आणि इतिहासाची साक्ष असलेल्या सुंदरगडावर (दातेगड) विजयादशमी दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सुंदरगड संवर्धन समितीच्या मावळ्यां बरोबर ग्रामस्थांनी गड स्वच्छ करून भगव्या पताकांनी गड सजविला. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वशंज जयवंतराव मोहिते – सरपंच तळबीड, सरदार घराण्यातील श्रीमंत विजयसिंह पाटणकर, यशवंतराव जगताप यांच्या हस्ते गड पुजन, ध्वजपुजन, गड देवदैवतांचे पुजन, शस्त्र पुजन सीमोल्लंघन करण्यात आले. यावेळी शिवकालीन घोषणांनी किल्ले सुंदरगड दणाणून गेला. मयुर उबाळे यांच्या जय तुळजा भवानी गोंधळ समुहाने इतिहास गोंधळ घातला. तर कुमारी कोमल मांडवकर हिने अफजलखानाचा वद या पवाड्याने गडावरील वातावरण शिवकालीन केले.

यावेळी जयवंतराव मोहिते म्हणाले पाटण महालातील सुंदरगड हा इतिहासाची एक साक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या बरोबरीने या गडकिल्ल्यांनी स्वराज्य राखले. म्हणून आज आपण आहोत. आता या गडकिल्ल्यांना राखण्याची वेळ आजच्या तरुणांच्याकडे आहे. सुंदरगडावरील हे नैसर्गिक देखन रुप आणि गडावरील आजचा दसरा उत्सव पाहताना शिवकालीन इतिहासाच्या विलक्ष क्षणात गेल्याचा भास झाला. दसरा उत्सवाची पारंपारीक परंपरा सुंदरगड संवर्धन समितीने गडावर पुन्हा सुरू करून आजच्या नवीन पिढी समोर इतिहास जागा ठेवण्याचे काम केले आहे. सुंदरगडावरील हा दसरा उत्सव पुढे भविष्यात इतिहासीक दसरा उत्सव यात्रेचे स्वरूप प्राप्त करेल. असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीमंत विजयसिंह पाटणकर, शिवप्रेमी मनोहर यादव, चंद्रहार निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान पिपंळोशी येथील शिवमावळे विशाल निकम, शिवराज निकम व त्यांच्या सहकार्यांनी गडपरिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या दसरा उत्सवास सुंदरगड संवर्धन समितीचे मावळे महादेव खैरमोडे, लक्ष्मण चव्हाण, शंकर मोहिते, काशिनाथ विभुते, अविनाश पराडकर, अनिस चाऊस, यसुफ हकिम, राजेंद्र साळुंखे, आनंदा मोळावडे, राम साळुंखे, यांचेसह संभाजी मोहिते, प्रताप मोहिते, योगेश मोहिते, किसन मांडवकर, क्रुष्णत मांडवकर, उत्तम मारसिंग, बंडू पवार, आदी ग्रामस्थ नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular