पाटण:- वाढती महागाई, वाढती बेरोजगारी च्या विरोधात राज्यात सगळीकडे उठाव होत असताना पाटण शहरात देखील तरुणांनी व महिलांनी एकत्र येवून युती सरकारच्या विरोधात उठाव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रचारार्थ पाटण शहरातून जल्लोषात पदयात्रा काढली. या पदयात्रेत शहरातील तरुणांच्यासह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
पाटण शहरातील रामापूर येथील मारुती मंदिरापासून सकाळी १० वा. या पदयात्रेची सुरवात झाली. हि पदयात्रा नवीन एस.टी. स्टैंड, झेंडा चौक, लायब्ररी चौक मार्गे वाड्याजवळ आली. तिथे या पदयात्रेचे सभेत रुपांतर झाले. यावेळी बोलताना युवा नेते याज्ञसिंह पाटणकर म्हणाले. शरद पवार या चांगल्या नेतृत्वावर पाटणची निष्ठा आहे. या दुरदृष्टी असलेल्या नेत्याने पाटण तालुक्याला भरभरून दिले आहे. या नेतृत्वावर राज्यातील अनेक नेते मोठे झाले. त्यांनी शरद पवारांची साथ अर्ध्यावर सोडली. अशी गद्दारी पाटणकरांच्या रक्तात नाही. आज पवार साहेबांच्या पाठीमागे राज्यातील तरुण मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे. तेच चित्र पाटण तालुक्यात आहे. असे सांगून याज्ञसिंह पाटणकर पुढे म्हणाले विकासाचा पंचनामा करायचा म्हणल्यावर १८०० कोठीतला एक रुपया देखील पाटण शहरात आला नाही. केवळ खोट्या बाडा मारुन १८०० कोठीचा विकास नाचवला जातोय.
पाटण तालुक्यात विक्रमसिंह पाटणकर दादांच्या माध्यमातून खरा विकास झाला आहे. घाट रस्ते, रस्ते, शाळा, समाज मंदिरे, लाईट, पिण्याच्या पाण्याच्या योजना, हा विकास आधीच दादांनी करून ठेवला आहे. या विकासाबरोबर पाटण तालुक्यातील दादांनी रोजगार निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात केली. मात्र पाटण तालुक्यातील हे रोजगार विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. स्वतः काही चांगले करायचे नाही आणि दुसऱ्या ला काही चांगले करून द्यायचे नाही. असा उध्दोग मात्र विरोधकांनी नेहमी केला. त्यांनी आमदारकीच्या दहा वर्षातील काळात किती तरुणांना नोकऱ्या दिल्या. किती उध्दोग व्यवसाय निर्माण केले. किती नवीन प्रकल्प आणले हे एकदा उघड सांगावे. मगच तरुणांच्याकडे मते मागण्यांचा अधिकार ठेवावा. आता खरी गरज आहे ती रोजगार निर्मिती ची तरुणांच्या हाताला काम देण्याची. तरच खऱ्या अर्थाने पाटण तालुका सक्षम होणार आहे. यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे तरुण ऐकवटला आहे. असे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी सरपंच चंद्रकांत मोरे, संजय इंगवले, चंद्रहार निकम, मनोहर यादव, यांनी मनोगत व्यक्त केली. या पदयात्रेत माजी नगराध्यक्ष सौ. सुषमा महाजन, माजी सरपंच सौ.कल्पना चौधरी, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, नगरसेवक दिपक शिंदे, किरण पवार, अजय कवडे, धर्यशील पाटणकर, शिवाजी माने, गणेश मोरे, मंगेश पाटणकर, समिर सय्यद, पराग चव्हाण, राहूल पवार आदीसह नगरसेवक, नगरसेविका पाटण शहरातील तरुणासंह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.