Friday, October 17, 2025
Homeठळक घडामोडीएक बार जो कमेंटमेंट कर दी तो,  मै अपने आप कि भी...

एक बार जो कमेंटमेंट कर दी तो,  मै अपने आप कि भी नही सुनता. – आदित्य ठाकरेंची उदयनराजे भोसले यांच्या समोर कमेंटमेंट.

 

पाटण : – खूप कमी आमदार असतात कि जे जनतेसाठी नेत्याला हैराण करतात तसे एक आमदार आहेत शंभूराज देसाई हे जनतेची विकासकाम मंजूर करण्यासाठी नेत्याला हैराण करतात. मी स्वतः २९ वर्षाचा असताना जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. आमचं ही असंचं आहे, एक बार जो कमेंटमेंट कर दी तो,  मै अपने आप कि भी नही सुनता. अशी कमेंटमेंट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मल्हारपेठ येथे आयोजित प्रचार सभेमध्ये केली.

यावेळी व्यासपीठावरती शिवसेना संपर्क प्रमुख नितिन बानुगडे पाटील, श्रीमंत उदयनराजे भोसले, आ. शंभुराज देसाई, पुरुषोत्तम जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख रणजित भोसले, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, माजी जि प उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आदित्य ठाकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, मी स्वतः शंभूराजेंना विचारलं होतं कि खरचं प्रचार करायची गरज आहे काय? पाच वर्षामध्ये इतकं भरभरून दिलंलं असताना प्रचाराची आवश्यकताचं काय आहे? आज जे वातावरण आहे तेच २४ तारखेला दिसणार आहे. मी स्वतः इथं आलेलो आहे ते महाराजांचा आशिर्वाद घेण्यासाठी. तसेच आत्ता पर्यंत राष्ट्रवादी जिंकत होती मात्र आत्ता आज राष्ट्रवाद जिंकणार आहे. कारण आत्ता जे बोलतो ते करून दाखवणारे सरकार आहे. शिवसेनेचा वचननामा हा शाळकरी मुलं, महिला, शेतकरी, युवा वर्ग व सर्वसामान्य जनतेच्या गरजांची पूर्तता करणारा  आहे. असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

श्रीमंत उदयनराजे भोसले म्हणाले समोर जमलेला जनसमूह पाहून असं वाटते कि ही प्रचार सभा नाही तर विजयीसभा आहे. माझा विरोधात जे उभे आहेत त्यांनी तर कहरचं केला कारण ते सांगतात कि, तरुणांना वाव द्या परंतू त्यांच्या कडे बघून असं वाटतं कि, तरूणांना वाव दिला पाहिजे परंतू उमेदवारी माझीचं पाहिजे असं त्यांना म्हणायचं असेल. डोंगर पठारावरील लोक उद्योगधंद्यासाठी मुंबई पुण्याला स्थलांतरीत झाले. त्यांचा परतीचा प्रवास करायचा आहे आणि जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे उभे करायचे आहेत. अस त्यांनी सांगितले.

यावेळी आ शंभूराज देसाई यांनी आपल्या भाषणामध्ये, निवडणूकिपुरता जनतेसमोर येणारा मी नाही. आमदार असलो तरी आपल्या सेवेत आहे आणि मध्यतरी रजेवरती होतो तरीही तुमच्या सेवेत होतो. केलेल्या विकासकामांच्या जोरावरती मी जनतेकडून मत घेणार आहे. विरोधक म्हणतात कि, नुसत्याचं घोषणा आहेत परंतू माझं असं म्हणणं आहे कि मागिल पंचवार्षिक निवडणूकिनंतर तोंड दाखवलेल्यांनी   माझ्या बाबत बोलूचं नये. उध्दव ठाकरेंचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला व माझ्या तालुक्याला भरभरून निधी दिला. मतदार संघाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम या पाच वर्षामध्ये मी केलेलं आहे. मला जेवढी मतं मिळतील तेवढीचं मत महाराजांना ही द्यायची आहेत. आम्हाला बोलून दाखवायची सवय नाही आम्ही करून दाखवतो असं सांगितले. त्यांनी सांगितले.

यानंतर संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये, सातारा जिल्ह्याचं एक गणितं आहे जिकडे महाराज आहेत तिकडे जिल्ह्याची सत्ता आहे. विकास कामांचं जाळ पसरवणारे शंभूराजे हे मतदार संघात सक्रिय असणारे आमदार आहेत. सिंचन घोटाळ्यामध्ये जनतेचे पैसै खाणारेचं आज उदयन महाराजांनी जनतेचा पैसा वाया घालवला असं म्हणतं आहेत. राजीनामा द्यायला वाघाचं काळीजं लागतं.

मल्हारपेठ येथे झालेल्या प्रचार सभेमध्ये जि प सदस्य, पं स सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जि प सदस्य विजय पवार यांनी आभार मानले. चौकट, शंभूराजेच्या वक्तव्यावरती शिट्टया व टाळ्या शंभूराजेंनी केलेल्या विकास कामांची गावांची यादी न थांबता सांगायला लागताचं युवकांनी व महिलांनी जल्लोष केला.  तब्बल १० ते १५ मिनिटे न थांबता तोंडपाठ गावांची यादी त्यांनी सांगितली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular