Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडीबोटाला धरून विकास दाखवण्याची हिम्मत आहे : आ.शंभुराजे

बोटाला धरून विकास दाखवण्याची हिम्मत आहे : आ.शंभुराजे

नवारस्ता: पाटण मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा आपण विकासच केला आहे ते केवळ पोकळ आकडे नाहीत म्हणूनच पाटण मतदारसंघात विकासाचा डोगर उभा राहिला आहे आणि विरोरोधकांना हे जर उघड्या डोळ्यानी दिसत नसेल तर त्यांच्या बोटाला धरून मतदारसंघातील विकासकामे दाखविण्याची आपली हिम्मत आहे.असा घणाघात आमदार शंभूराज देसाई यांनी केला. सुपने मंडलातील सुपने आणि तांबवे येथील जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परीषद सदस्य प्रदिप पाटील,माजी बाजार समिती सदस्य प्रकाशराव पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलिंद पाटील, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण,प्रभाकर शिदे,रयत कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, बबनराव शिंदे सर,कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक श्रीमंत काटकर, शिवाजीराव शिंदे,तुकाराम डुबल, हणंमत निकम, डॉ.पांडुरंग निकम, लक्ष्मण देसाई, संदीप सावंत, आनंदराव कदम, हाशम मुजावर,अनिल कदम,सुनिल पाटील, माणिकराव सुर्यवंशी, सचिन पाटील, नेहरु बापू, अशोकराव माने,संदीप साळुंखे, अर्जुन कळंबे, अमित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,सुपने मंडल हे पाटण मतदारसंघाला जोडून 10 वर्षाचा काळ लोटला.लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सुपने मंडलातील पुनर्वसना साठी आपले आयुष्य वेचले त्यामुळे सुपने मंडल आणि देसाई घराणे यांचे फार जवळचे आणि आपुलकीचे ऋणानुबंध आहेत.या विभागाचे नेतृत्व यापुर्वी कराड दक्षिणचे माजी आमदार विलासराव पाटील हे करीत होते.या विभागातील नागरिकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची कामे दिली.विलासकाकांनी मला ही त्याचवेळी सांगितले कि या विभागातील जनतेची भूक केवळ विकासकामे आहेत आणि सुपने मंडलात गाव तेथे विकास ही संकल्पना राबवून आम्ही गेल्या पाच वर्षात या विभागातील जनतेची विकासाची भूक भागविण्याचा निश्चित प्रयत्न केला आहे.अद्याप ही बॅकलॉग बाकी असून तो मी आगामी काळात निश्चित भरून काढणार आहे .मागील निवडणूकीत या विभागाने मला दोन हजारांच्या वर मताधिक्क्य दिले होते.
या निवडणूकीत भागात झालेली विकासकामे पाहून मागील निवडणूकीपेक्षा जादाचे मताधिक्क्य दयावे असे आवाहन करून आमदार देसाई म्हणाले,असून सुपने मंडलातील प्रत्येक गांवामध्ये आपण विकासाचे काम दिले आहे विकासाचा हा झंझावात असाच कायम सुरु ठेवण्यास मी कटीबध्द असून या विभागालाही पाटण मतदारसंघातील इतर विभागांच्या प्रमाणे विकास कामांत झुकते माप दिले जाईल.तसेच विकास कामासाठी जे जे काम सांगाल ते ते करण्यासाठी जबाबदारी आणि कर्तव्याच्या भावनेतून पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान सुपने मंडलाने गेल्या दोन विधानसभा निवडणूकीत पाटणच्या लोकप्रतिनिधींना मतदान करण्याचे काम केले 2014 च्या विधानसभा निवडणूकीत या विभागाने मला भरघोस असे मताधिक्कय देवून माझे 18824 च्या मताधिक्कयामध्ये मोलाचा वाटा उचलला याचा मला आनंद आहे. 2009 च्या विधानसभा निवडणूकीतही या विभागाने पाटणच्या माजी आमदारांना मतदान केले. केलेल्या मतदानाच्या बदल्यात माजी आमदारांनी या विभागाला किती विकासाची कामे दिली?किती नागरिकांचे प्रश्न त्यांनी सोडविले?असा सवाल करून येणार्‍या प्रत्येक नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे कामच आहे.
गेल्या पाच वर्षात युतीच्या शासनाने कोटयावधी रुपयांचा निधी मतदारसंघातील विकास कामांकरीता दिला त्या निधीतील बहूतांशी वाटा या सुपने मंडलामध्ये देण्याचा मी प्रयत्न केला.आज या विभागातील प्रत्येक गांवामध्ये विकासाचे काम सुरु आहे. विकासाचे काम करणार्‍या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची परंपरा या विभागाला आहे. तीच परंपरा या विभागाने कायमस्वरुपी जपावी केवळ निवडणूकी पुरते मतदारांच्या दारात जायचे व मते मागून गेल्यावर त्यांच्या सुखदु:खात ढुंकूनही पहायचे नाही ही आपल्या विरोधंकाची पध्दत आहे.मात्र आपण तसे केले नाही या विभागातील समस्या जाणून घेणेकरीता आपण या विभागाचा स्वतंत्र असा जनता दरबार घेतला अनेक नागरिकांचे प्रश्न आपण जागेवर सोडविले तसेच विकासाकामांची ज्या ज्या गांवाना व वाडयावस्त्यांना आवश्यकता आहे त्या त्या गांवाना व वाडयावस्त्यांना आपण विकासाचे काम देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. गतवेळी पेक्षा अधिक मताधिक्य देवून पाटण विधानसभा मतदारसंघाचा विकास आणखीन गतीने करण्याकरीता मला पाठबळ दयावे तसेच महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही माझेबरोबरीने मतदान करावे अशी विनंती आमदार शंभूराज देसाई शेवटी त्यांनी केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular