फलटण: ढवळ (ता.फलटण) शिंदे वस्ती येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी कु.कोमल प्रकाश शिंदे हिस विजेचा शॉक बसून तिचा मृत्यू झाला असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
मंगळवार दि.29 रोजी सकाळी दुधाची बादली लोखंडी शेडमधील अँगलला अडकविण्यासाठी कु. कोमल गेली होती. दुधाची बादली लोखंडी अँगलला अडकवित असतानाचा विजेचा शॉक बसला. तिला खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. प्रकाश दिनकर शिंदे यांची ती कन्या होत. उदयन्मुख कबड्डीपटटु होती. या दुर्दैवी घटनेमुळे ढवळ परिसरात शोककळा पसरली आहे.
विजेचा शॉक लागून युवतीचा मृत्यू
RELATED ARTICLES