फलटण: फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगरपालिकेमध्ये सादर केला असून त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे ही सादर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून फलटण नगर परिषदेमध्ये अंतर्गत कलह दिसून येत होते. त्याचाच पुढचा भाग म्हणून नंदकुमार भोईटे यांनी राजीनामा सादर केला असल्याची चर्चा सध्या फलटणच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे.
गत काही महिन्यापासून नगरपालिकेत नेवसे विरुद्ध भोईटे हा संघर्ष बघण्यास मिळत होता. या ना त्या कारणावरून हा संघर्ष चव्हाट्यावर येत होता त्या संघर्षावर आता पडदा पडला की आता वाद वेगळ्या वळणावर पोहचणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.आगामी काही दिवसात नंदकुमार भोईटे यांची नक्की कोणती भूमीका असणार हे नगरपालिकेच्या सभागृहात व सभागृहाबाहेर कळणार आहे.
आजारपणामुळे राजीनामा: नंदकुमार भोईटे
राजीनामा दिल्याबाबत नंदकुमार भोईटे यांच्याशी बातचीत केली असता माझे आजारपण व घरगुती कारणांमुळे मी राजीनामा सादर केला आहे. इतर कोणतेही कारण नाही व इतर कोणतेही अर्थ लावून घेवू नयेत असे नंदकुमार भोईटे यांनी स्पष्ट केले.
फलटण उपनगराध्यक्षांचा राजीनामा
RELATED ARTICLES