फलटण: पिंपरी चिंचवड ते विजापूर या एस टी बसमधून फलटण येथे येणार्या महिलेचे प्रवासादरम्यान कपडयाच्या बॅगमधील एका मोठया पर्स मध्ये ठेवलेले सुमारे 10 तोळे वजनाचे दागिने अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, दि. 12 रोजी सकाळी 9 वाजता स्वारगेट पुणे येथून पिंपरी चिंचवड ते विजापूर या एस टी बस मधून फलटण मध्ये येत असताना फिर्यादी श्रीमती विजया लक्ष्मण गाणबोटे यांनी त्यांची कपडयाच्या बॅग मध्ये एका मोठया पर्स मध्ये एका छोटया पर्स मध्ये ठेवलेले सुमारे 10 तोळे वजनाचे सोन्याचे 2 लाख रुपये किंमतीचे दागिने ठेवलेले होते. सदरची एस टी बस निरा बस स्टॉपवर आली. त्यावेळी तीन महीला बस मध्ये बसल्या व त्यातील एक महिला शिटवर बसली व तिचे लहान बाळ फिर्यादी यांचे मांडीवर दिले व दोन महिला फिर्यादी यांच्या बॅग जवळ बसल्या थोड्या वेळाने त्या सर्व महिला लोणंद बसस्थानक येथे उतरल्या. यानंतर फिर्यादी यांनी घरी येवून पाहिले असता त्यांनी पर्स मध्ये ठेवलेले दागिने मिळून आले नाही त्यावेळी त्यांचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरले असल्याची खात्री झाली. याबाबत फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहवा फरांदे करीत आहेत .
प्रवासादरम्यान महिलेचे दोन लाख रूपयांचे दागिने लंपास
RELATED ARTICLES

