फलटण: सर्वसामान्य नागरीकांना कायदे विषयक माहिती व्हावी याकरिता राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे औचित्य साधून फलटण येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून, विधी प्राधिकरणामार्फत राबवल्या जाणार्या विविध योजनांचे व कायदेविषयक माहिती देणारे फलक रॅलीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. यावेळी नागरिकांना महितीपत्रकांचे वाटप करून त्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई व सातारा जिल्हा विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय सातारा यांचे निर्देशानुसार फलटण विधी सेवा प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय विधी सेवा दिन जिल्हा व तालुका स्तरावर दि.9 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात आला.
या विधी सेवा दिनानिमित्त फलटण शहरात फलटण तालुका विधी सेवा समिती व फलटण वकिल संघ यांचे संयुक्त विद्यमानाने रॅलीचे आयोजन करणेत आलेले होते.
या रॅलीला प्रमुख दिवाणी व फौजदारी न्यायाधीश अर्चना ठाकूर-मोरे यानी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी फलटण न्यायालयातील कार्यरत असणारे न्यायाधीश यु.एम.वैद्य, न्यायाधीश के.के.पाटील, न्यायाधीश व्ही.जे.जाधव, न्यायाधीश के.ए. पोवार, न्यायाधीश वाय.सी.पाटील, फलटण वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.राहुल कर्णे, उपाध्यक्ष अॅड.राहुल बोराटे, सचिव अॅड.रणजित भोसले व इतर महिला व पुरुष विधीज्ञ तसेच फलटण न्यायालयातील सर्व कर्मचारी वर्ग, पंचायत समिती फलटण चे प्रभारी सहा.गट विकास अधिकारी किरण उदमले व पंचायत समितीकडील कर्मचारीवर्ग, तसेच विधी महाविद्यालय. मुधोजी हायस्कूल, यशवंतराव चव्हाण हायस्कूल व वेणुताई चव्हाण हायस्कूल चे सर्व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरीकांना कायदेविषयक माहिती व्हावी, हा या रॅलीचा उद्देश होता. या रॅलीमध्ये फलटण विधी सेवा समिती फलटण याचे मार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनाचे फलक या रॅलीमध्ये प्रदर्शित करणेत आले होते. याप्रसंगी गर्दीच्या ठिकाणी नागरीकाना विधी सेवा समितीमार्फत दिल्या जाणा-या सेवांची माहिती देणारी विविध प्रकारची माहिती पत्रके वाटण्यात आली.
यावेळी विधी सेवेच्या योजनांचा लाभ घ्यावा असे प्रमुख दिवाणी व फौजदारी न्यायाधीश मा.अर्चना ठाकूर-मोरे व फलटण वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.राहल कर्णे यांनी आवाहन केले.
ही रॅली दिवाणी व फौजदारी न्यायालय फलटण – गिरवी नाका – अधिकार गृह – महात्मा फुले चौक – गजानन चौक – श्रीराम मंदीर – पाचबत्ती चौक – छ.शिवाजी महाराज चौक – डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक – डेक्कन चौक – अशी आयोजित करणेत आली होती.
राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे औचित्य साधून फलटण येथे रॅलीचे आयोजन
RELATED ARTICLES