फलटण: फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील राजाळे गावातील राहुल दोंदे या युवकाने देवाला सोडून दिलेल्या गाईचा हा खोंड होता. आज सकाळी त्याच्या पायाचा धोंड शीरे शीरेवर लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त स्ञाव झाल्यामुळे तो घायाळ झाला.
प्रथम डॉ.तोरसे यांनी प्रथमोचार केले. ग्रामस्थांनी त्यांच्यावर वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरांना पाचारण केले. गुणवरे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश गावडे, डॉ.मोरखाने, डॉ.निंबाळकर,डॉ.तोरसे डॉ.गोडसे आणि गावातील इतर डॉक्टरांनी प्रयत्न केले.
सकाळी दहा वाजता पासून त्यावर भूल देवून त्यास ताब्यात घेऊन जखमेवर टाके घालून रक्त स्ञाव बंद करण्यात येवून औषध उपचार करण्यात आले. उपचाराला साथ दिली नाही अखेर मृत्यू झाला.
लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांना दुखः झाले. कटाळ्या दिमाखदार ऐटीत रस्त्यावर परेड करत असताना. राजाळे बस स्थानकावर प्रवाशांची सतत वर्दळ असताना कधीही त्याने कोणाला त्रास उपद्रव दिला नाही. देत नव्हता.त्याची दौड आता काळाच्या पडद्याआड केल्याने अनेकांना हुरहुर लागली.
गावातील महिलांनी अबालवृद्ध आणि परिसरातील नागरीकांनी ओवाळून दर्शन घेतले.
कटाळ्याचे निधना बद्दल अनेकजण हळहळले भजनी मंडळांनी त्याची टाळ मृदंगाच्यासाथीने अंत्ययात्रा काढली. अंत्ययाञेमध्ये गावातील लहानांपासून थोरांपर्यत लोक सहभागी झाले होते.
धार्मिक विधीपूर्वक त्याचा वर अंत्यसंस्कार करून दफन करण्यात आले.
कटाळ्याच्या निधनाने राजाळे गावातील अबालवृध्द हळहळले
RELATED ARTICLES