फलटण: फलटण येथील मुधोजी क्लब मैदानावर सातारा पोलीस व फलटण उपविभागातर्फे निर्भया रॅली व परीसंवाद हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयीन मुलीं मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आयोजित कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी या सर्व मुलींना मार्गदर्शन केले. तसेच संजीवराजे निंबाळकर, मधुबाला भोसले, सुभद्राराजे निंबाळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे उपस्थित होते. फलटण शहरांमधील सर्व महाविद्यालय हायस्कूलमधील मुले व मुली अशी एकूण 2500 विद्यार्थी तसेच विविध सामाजिक सस्थांच्या महिला भगिनी हजर होत्या.
यावेळी मुधोजी हायस्कूलच्या वतीने सेल्फ डिफेन्सची प्रात्यक्षिके क्रिडा मार्गदर्शक सतिश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आली. तसेच मुधोजी कॉलेज व शरद पवार कॉलेज लोणंद यांच्या संयुक्त वतीने सामाजीक व निर्भया पथकाचे पथनाट्य सादर करण्यात आले. कार्यक्रमानंतर फलटण शहरामधून भव्य रॅली काढण्यात आली होती. रॅली म.फुले चौक, गजानन चौक, उमाजी नाईक चौक, महावीर स्तंभ, आंबेडकर चौक, नाना पाटील चौक मार्गे महाराजा महाराजा मंगल कार्यालय येथे नेण्यात आली.
महाराजा मंगल कार्यालय याठिकाणी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते व प्रमुख महाविद्यालय प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी मुलींशी परीसंवाद साधला.
यावेळी उपस्थित मुलींनी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते व ईतर मान्यवर यांना विविध विषयांवर प्रश्न विचारले. त्यास पोलीस अधीक्षक व इतर मान्यवरांनी उत्तरे दिली.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उपविभागीय पोलीस आधिकारी तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, सपोनि रावळ निर्भया पथकाची टीम त्यामध्ये महिला पोलीस हवालदार वैभवी भोसले, पोलिस काँ.शिवराज जाधव, महिला पोलीस काँ. आरूषी भोसले तसेच गोपनीयचे पोलीस काँ.सतीश दडस, रविंद्र खाडे, अमृत करपे, पो.काँ दत्ता नाळे यांनी केले होते.