फलटण: नागरीकत्व सुधारणाकायद्याला विरोध करण्यासाठी फलटण तालुक्यातील मुस्लीम समाजाने एकसंघ होत प्रांत कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढून प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आणि नागरीकत्व सुधारणा कायद्याला जोरदार विरोध केला.
आज दुपारी शहरातील सर्व मशिदी मध्ये जुम्मा नमाजचे पठण झाल्यानंतर ऐतिहासिक आणि प्राचीन अशा बादशाही मशीद पासून मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली या कायद्याचा निषेध म्हणून दंडावर काळ्या फिती बांधून मुस्लिम समाज बांधवांनी काढलेला मूक मोर्चा गजानन चौक,महात्मा फुले चौक मार्गे प्रांत कार्यालयाजवळ येताच पोलिसांनी तो अडविला यावेळी समाजाच्या वतीने प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना नागरित्त्व सुधारणा कायदा विरोधात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नागरिकत्व सुधारणा कायदा केंद्र सरकारने बहुमताच्या आधारे पारित केलेला असला तरी तो मुळ संविधानाचे विरोधी आहे सदरचा कायदा धर्म द्वेेेष, देशाचे ऐक्य अखंडता व सामाजिक सलोखा धोक्यात आणणारा असून देशात धार्मिक ध्रुवीकरण होऊन सर्वसामान्य समाज व्यक्तीच्या खाईत लोटला जाईल तोच संपूर्ण देशवासियांसाठी चिंताजनक असून अशा अविचारी अव्यवहारी निर्णयामुळे देशांतर्गत गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन सामाजिक ऐक्य व सलोखा बाधित होणार आहे.
केवळ धर्माच्या आधारे मुस्लिम समाजाला बहुसंख्य समाजापासून वेगळे पाडण्याचा डाव असून नागरिकत्व सुधारणा कायदा मानवी धर्माच्या आधारे भेदभाव करणार आहे आज देशाची आर्थिक समस्या बेरोजगारी, दलित, आदिवासी, मुस्लिम समाजाचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत सध्याचे सरकार देश प्रगतीपथावर येणे कामी अपयशी ठरत असल्याने अशा परिस्थितीत जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी विद्यमान सरकारने हे विधेयक मंजूर केलेले आहे आज देशाच्या संविधानाला आव्ह्हान दिलेले असून घटनेचे अस्तित्व हळू हळू संपविण्याचा घाट या केंद्र सरकारने घातला असल्याने आमचा या कायद्याला विरोध आहे या देशातील मुस्लीम हे मूळ निवासी असून हजारो वर्षापासून येथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. या विधेयकाच्या आधारे मुस्लिम समाजाचे मूलभूत अधिकार काढून घेण्याचा धोका असून धर्माच्या आधारे भेदभाव करून नागरिकत्व नाकारणे हा भारतीय राज्यघटनेचा द्रोह आहे आम्ही सर्व या विधेयकाला तीव्र विरोध करीत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी बादशाही मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष सलीमभाई शेख,नगरसेवक असिफ मेटकरी, माजी नगरसेवक जाकीर भाई मणेर, फिरोज आतार, हाजी नियाज कुरेशी, हाजी नियाजभाई आतार,हाजी सादिकभाई बागवान,सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख,अॅड. जावेदभाई मेटकरी, अॅड. सलीम शेख, मेहबूब मेटकरी, पप्पू शेख,रियाज इनामदार, जमशेद पठाण,फिरोज बागवान, मतीनभाई बागवान, रहीम तांबोळी, सिकंदर डांगे, समीर तांबोळी, शगिर शेख, सलीम खान,जावेद शेख, आमिरखान मेटकरी आदी उपस्थित होते.
आज मोर्चाला सुरुवात होण्याअगोदर मुस्लिम समाजातील तरुणांनी शांततेत मोटार सायकल रैली काढून छ. शिवाजी महाराज, क्रतिसिंह नाना पाटील,डॉ बाबासाहेब आंबेडकर,क्रतिवीर उमाजी नाईक, महात्मा ज्योतिबा फुले,श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर या थोर पुरुषांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले आणि भारतमाता की जय अशा घोषणा दिल्या.
नागरीकत्व कायद्याच्या विरोधात फलटणला मुस्लीम समाजाचा विराट मूक मोर्चा
RELATED ARTICLES

