Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीग्राहक चळवळीस व्यापक स्वरुप आणण्याची आवश्यकता: भोसले

ग्राहक चळवळीस व्यापक स्वरुप आणण्याची आवश्यकता: भोसले

फलटण: ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी ग्राहक चळवळीस व्यापक स्वरुप आणण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांनी ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांना केंद्रबिंदू मानून ग्राहक हितासाठी कार्यरत रहावे असे आवाहन ग्राहक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार किसनराव भोसले यांनी केले.
फलटण तहसिल कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रांतअधिकारी शिवाजी जगताप, तहसिलदार हनुमंत पाटील, जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचे सदस्य प्रा. दिलीप भोसले, आगार व्यवस्थापक राहूल कुंभार, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे फलटण तालुका अध्यक्ष मेजर डॉ. मोहन घनवट, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे स. रा. मोहिते, नंदकुमार भोईटे, किरण बोळे, भाजपचे बजरंग गावडे आदी माण्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्राहकास आपल्या हक्कांची जाणीव करुन देणे व त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याला प्रामाणिक सेवा देणे हे ग्राहक पंचायतीच सेवाभावी उद्दीष्ट आहे. ग्राहक चळवळीत काम करणार्या कितीही संस्था असल्या तरी मग्राहक हितफ हे त्यांचे अंतिम ध्येय असायला हवे असे निदर्शनास आनून देत भोसले म्हणाले, ग्राहक चळवळीत उत्कृष्टपणे काम करणारा तालुका अशी ओळख फलटण तालुक्याची सर्वश्रुत होती. ती ओळख पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी आता ग्राहक चळवळीत काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते. घेणारा व देणारा जर जागरुक असेल तर लुबाडणूक निश्चितपणे टळेल. प्रत्येक महिन्यात सर्व विभागांचे अधिकारी व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी व सदस्य यांची बैठक होणे आवश्यक असुन अशा बैठकी सुरु होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षाही भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमात प्रारंभी माण्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले.
उपस्थितांचे स्वागत पुरवठा निरीक्षक मनोज काकडे यांनी केले. आभार तहसिलदार हनुमंत पाटील यांनी मानले. कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, व्यापारी संघटना, स्वस्त रेशन धान्य संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, विविध विभागांचे अधिकारी व ग्राहक चळवळीत काम करणारे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular