फलटण प्रतिनिधी – फलटण शहरातील मलठण मध्ये गेली पाच वर्षां पासून प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याचप्रमाणे अवैद्य धंदे सुद्धा सुरू आहेत.दिवसा ढवळया घरातील सोने, रोख रक्क्म,पाण्याच्या मोटारी , साईकल,मोटर सायकल, मोबाईल व किरकोळ भंगार अशा वस्तु चोरीला जात आहेत. या मुळे या चोरांचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही त्यांचा बंदोबस्त करू असा इशारा मलठण करांनी मोर्चा काढून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दरम्यान फलटण शहरातील मलठणची लोकसंख्या पंधरा हजार पर्यंत आहे. या भागातील लोकांना भरदिवसा व रात्री सुद्धा लोकांना रस्त्यात अडवून चाकू व तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून रोख रक्कम व मोबाईल काढून घेतला जात आहे. त्याचप्रमाणे मोटार सायकल व चारचाकी गाड्या अडवून गाडयांची तोडफोड करून दहशत माजवली जात आहे.रात्री बेरात्री दारु व गांजा पिऊन घरांवर दगडफेक करून दहशत माजवली जात आहे. त्याचप्रमाणे मलठण मधील महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्रे चोरून नेले जात आहे. शाळेत जाणाऱ्या मुलींच्या मागे लागून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व त्यांना लज्जा उत्पन्न् होईल असे हावभाव करण्याचा सर्रास प्रकार चालू आहे .
त्याचप्रमाणे शेती शाळेत शिकणाऱ्या बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थांना आडवून चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देवून त्यांचेकडून रोख रक्कम व मोबाईल, गळयातील चैन, अंगठी इतर वस्तु जबरदस्तीने काढून घेतले जात आहे. त्याचप्रमाणे खाजगी सावकाराच्या नावाखाली गोरगरिबांकडून मोठया प्रमाणात व्याजाची रक्कम वसूल करून व्याजाच्या रकमेपोटी जमीन व राहती घरे नावांवर करून घेतली जात आहे. त्याचप्रमाणे बेकायदेशीर रित्या दारू भटया टाकून दारूची व गांजाची विकी चालू आहे. हा सर्व प्रकारची गुन्हे इंदिरा नगर मलठण येथील राहणारे कै. मानिक जाधव यांची मुले व नातंवाडे हे सातत्याने करीत असून संपूर्ण मलठण परिसरात त्यांनी दहशत माजवली आहे. त्यामुळे संपूर्ण मलठण अशांत व अस्वस्थ् आहे. सदर मुले व नातंवडे यांचेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे फलटण शहर व ग्रामीण पोलिस स्टेशनला नोंदलेले आहे. हे सर्वजण सराईक गुन्हेगार असून संघटित पणे एकत्रित गुन्हे करीत आहे.
याबाबत त्यांच्या विरूद्ध कोणी बोलल्यास ते घरातील त्यांच्या महिलांना पुढे करून उलट महिलांवरच अन्याय झाला असे खोटे चित्र उभे करीत आहे. त्यांच्या घराती महिलांचासुद्धा हया सर्व गुन्हयात सहभागी असून त्यांचा गुन्हयात सक्रीय संबंध असतो. त्यांच्या या गुन्हे करण्याच्या प्रवृत्ती मुळे मलठण मधील महिला, विद्यार्थी, लहान मुले व मुली, नागरिक भितीच्या छायेखाली वावरत आहे. एकूणच मलठण मध्ये त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. तरी आपण स्वत : लक्ष घालून वरील इसमांवर कडक कारवाई करून त्यांच्यापासून होणाऱ्या त्रासातून मलठण मधील नागरिकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा हि मागणी निवेदनाद्वारे मोर्चा काढून केली आहे. यावेळी नगर पालिकेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर व ॲङ नरसिंह निकम अध्यक्ष फलटण कृती समिती, अशोकराव जाधव, राजेंद्र निंबाळकर,राजन भोसले, मोहनराव रणवरे, राजेंद्र नागटीळे, प्रमोद खलाटे व ईतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चोरट्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा आम्ही त्यांचा बंदोबस्त करु
RELATED ARTICLES