फलटण: तुकाराम बीज औचित्य साधून मतदान जनजागृती मोहीम कार्यक्रम दि.22 मार्च रोजी गाव ताथवडा तालुका फलटण जिल्हा सातारा येथे संपन्न झाला.लोकसभा निवडणूक तिसर्या टप्प्यातील मतदान दि.23 एप्रिल 2019 मतदान करण्याची संधी गमावू नका असा संदेश या कार्यकमा मध्ये देण्यात आले. संतोष जाधव उपविभागीय अधिकारी फलटण, हणुमंत पाटील तहसीलदार, अनंत गवारे नायब तहसीलदार फलटण, किशोर माने स्वीप पथक प्रमुख अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदान जनजागृती मोहीम कार्यक्रम 255 फलटण मध्ये सुरू आहे.
तुकाराम बिज औचित्य साधून मतदान जनजागृती कार्यक्रम मध्ये मतदार जनजागृती रॅली काढण्यात अली तसेच मतदान जनजागृती प्लेक्स लावण्यात आले होते यावेळी सचिन जाधव स्वीप सहायक अधिकारी यांनी मतदान जनजागृती बाबत माहिती व मतदान जनजागृती प्लेक्स चे वाचन केले. यावेळी किरण उदमले स्वीप सहाय्यक अधिकारी तसेच ताथवडा गावातील मतदार उपस्थित होते.
तुकाराम बिज औचित्य साधून मतदान जनजागृती
RELATED ARTICLES