फलटण: फलटण तालुक्यातुन 51 हजारापेक्षा जास्त लिड देण्याची शपत घेवून मीच रणजीतसिंह, मीच आगवणे हि भुमिका घेवून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन करत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना युवा नेते दिगंबर आगवणे यांनी पाठींबा जाहीर केला.
यावेळी सुशांत निंबाळकर, जाकेर भाई मणेर, अमीर शेख, अरुण खरात, ज्ञानेश्वर पिसाळ, अनिकेत कदम, स्वप्निल मुळीक, रणजीत निंबाळकर, जोतीबा भुजबळ, सुमित भोईटे, अभिजीत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांना मोकळ सोडणे किंवा दादांना पुर्ण ताकत देणे हा निर्णय घेणे महत्वाच होते. राष्ट्रवादीबरोबर जाणे म्हणजे आत्महत्या करणे होईल. माढा, करमाळा, पंढपुर याठिकाणी हितगुज साधली असता वातावरण विजयासाठी पोषक आहे. तर आपण मनावर घेतल्यास फलटण मधून एक लाखाच लिड घेता येईल. या निवडणूकीत खासदार फलटणचाच झाला पाहिजे. त्यांसाठी कार्यकर्ते यांचेसह रणजितसिंह नाईक निबांळकर यांना पाठींबा जाहीर करत आहे. तालुक्यातील मतदारांची कशी बांधणी करता येईल. मताधिक्य देण्यासाठी कोणत्या बाबी विचार घेवून आजपासून कामाला लागु असे आगवणे यांनी स्पष्ट केले.
महायुतीच्या माध्यमातुन होणार्या क्रांतीचा भाग होण्याचे आवाहन करत दिगंबर आगवणे यांनी शिवसेनेतील प्रवेश करावा व आगामी काळात आमदारकीच्या माध्यमातून फलटण – कोरेगाव मतदार संघात भगवा फडकावा असे शिवसेना तालुका प्रमुख स्वप्निल मुळीक यांनी मत व्यक्त केले. फलटण तालुक्यातील दिगंबर आगवणे यांची भुमिका निर्णायक ठरणार असून त्यांनी जाहिर केलेल्या पाठींब्यामुळे फलटण मधून निश्चित लिड घेता येईल असे फलटण तालुका भाजपा नेते सुशांत निंबाळकर यांनी मत व्यक्त केले. कार्यकर्ता संवाद व मतप्रकटन बैठकीस फलटण – कोरेगाव मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
दिगंबर आगवणे यांचा रणजितसिंह यांना जाहीर पाठींबा
RELATED ARTICLES