Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीरणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

फलटण : माढा लोकसभा मतदारसंघातुन भाजपा, शिवसेना, रा. स. पा., रिपाई, रयतक्रांती, शिवसंग्राम व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज आज सोलापुर येथे दाखल केल्यानंतर विजयी निशाणी दाखवुन प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ना.चंद्रकांतदादा पाटील (सार्वजनिक बांधकाम मंत्री), ना.सुभाषराव देशमुख (सहकार मंत्री), खा. हिंदुरावजी नाईक निंबाळकर, खा. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. प्रशांतजी परिचारक, आ.शहाजीबापु पाटील, आ. नारायण आबा पाटील,मा.आ.दिलीपजी येळगावकर, आ.बाबुरावजी माने, शहाजी पवार(अध्यक्ष सोलापूर भाजपा), अनिलजी देसाई (उपाध्यक्ष,सातारा भाजपा), दादासाहेब साठे, राजाभाऊ सरवदे, संजयजी कोकाटे,समशेरसिंह नाईक निंबाळकर, शिवाजीराव सावंत, दिगंबर आगवणे, महेंद्र बेडके, सुशांतभैया निंबाळकर, जयकुमार शिंदे, प्रदीप झणझणे, श्रीकांत बागल, धर्मराज पाटील, संजय पाटील भिमानगरकर आदि मान्यवर यांसह भाजपा, शिवसेना, रा. स. पा, रिपाई, रयतक्रांती, शिवसंग्राम व मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणजितसिंह म्हणाले की, माढ्याचा खासदार हा भाजपचाच असणार आणि भरघोस मतांनी निवडून येणार असा दावा यावेळी केला.ते पुढे म्हणाले,माढ्याचा विकास हेच ध्येय उराशी बाळगुन आपण या मतदारसंघातुन निवडणुक लढवत असुन माझ्या मागे जनता खंबीरपणे उभी राहिल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.निरा -भीमा स्थैरीकरण वनिरा देवघरचे राहिलेले काम पुर्ण करुन जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन देण्यात आले.
गेले अनेक वर्ष रेल्वे मार्गाचा प्रश्न चालु असुन लोणंद – फलटण – पंढरपूर मार्गाचा पाठपुरावा करुन आमची लढाई चालु असुन याचा पाठपुरावा केंद्रात करुन हा प्रश्न मार्गी लावणार असा दावाही रणजितसिंहांनी केला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular