फलटण : फलटण शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.सकाळी 10 च्या सुमारास नातेपुते येथुन आलेल्या ज्योतीचे स्वागत उपवाभागीय पोलीस अधिकारी डॉ.अभिजीत पाटील,पोलिस निरीक्षक प्रताप पोमण,जयंती मंडळाचे अध्यक्ष अविनाश सरतापे तसेच भिमसैनिक यावेळी उपस्थित होते.ज्योतीचे सर्व फलटणभर स्वागत करुन मंगळवार पेठेतील चावडी येथे ज्योतीचा समारोप करण्यात आला.
मंगळवार पेठेतील पंचशील चौकातुन सायंकाळी 7 वाजता विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मिरवणुकीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते दिगंबरशेठ आगवणे,सह्याद्री कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पंचशिल चौक- बारामती चौक- छञपती शिवाजी चौक – नाना पाटील चौक – डॉ.आंबेडकर चौक – महावीर स्तंभ – उमाजी नाईक चौक – महात्मा गांधी चौक- महात्मा फुले चौक – मारवाड पेठ – शुक्रवार पेठ- शंकर मार्केट – पाचबत्ती चौक मार्गे मंगळवार पेठेतील धम्मयान चौक येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.दोनच्या लाईनमध्ये रली काढण्यात आली होति.या मिरवणुकीमध्ये झांजपथक, हलगी पथक, घोडे, उंट, रथ यांचा सहभाग होता.महामानवास अभिवादन करण्यासाठी भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
RELATED ARTICLES