फलटण: जो स्वतःच्या पत्नीला कुटुंबाला न्याय देऊ शकत नसेल तो देशाला काय न्याय देणार असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावताना नोटा बंदीच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटणार्या लुटारू पंतप्रधानाला पुन्हा सत्ता देऊ नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले
माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. विजय मोरे यांच्या प्रचारार्थ येथील शिंगणापूर रोड लगत आयोजित जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते यावेळी व्यासपीठावर उमेदवार विजय मोरे माजी आमदार लक्ष्मण माने तुकाराम गायकवाड सुभाष मोहिते आनंदराव आढाव आदी उपस्थित होते
अमेरिकेने आतापर्यंत अनेक वेळा पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला मात्र त्याचे कधीही राजकारण केले नाही आपल्या देशात पंतप्रधान मोदी याचे राजकारण करून प्रसार करत आहेत हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे ज्यांची संस्कृती हिंसक आणि अत्याचारी आहे असा माणूस फक्त वल्गनाच करू शकतो आणि खोटे बोलू शकतो असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी मोदी यांना लगावला
मोदींनी केलेली नोटाबंदी ही फसवी आणि विनाकारण होती काळापैशावाल्यां कडून पैसा गोळा करण्यासाठीच ही नोटा बंदी आणली गेली असे सांगीतले गेले मात्र यामध्ये 60- 40 अशी तडजोड करून पैसा गोळा करण्यात आला या नोटाबंदीमुळे जनतेचा तर काही फायदा झालाच नाही मात्र भाजपला जोरदार फायदा झाला अशा लुटारू पंतप्रधानला पुन्हा सत्ता देऊ नका असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी केले
सध्या देशावर लुटारूंचे राज्य आहे त्याचा सरदार नरेंद्र मोदी असून सर्व कारभार मिलीभगत द्वारे चाललेला आहे असा आरोप करतानाच राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील आरक्षित जागेवरिल उमेदवारांचे संख्या सोडूंन इतर ठिकाणी जे काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार उभे राहिले आहेत ते एकमेकांचे नातेवाईक असून ही नातेवाईकांची निवडणूक दिसत आहे निवडणुकीचे हे मॅच फिक्सिंग असून सर्वसामान्य उमेदवार बाजूला सारण्याचे काम भाजपा काँग्रेस करीत आहेत लोकशाहीच्या दृष्टीने हे घातक असल्याने आम्ही सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य उमेदवारांनाच लोकसभेची उमेदवारी दिली आहे आमच्या उमेदवारांचे जनतेतून स्वागत होत आहे त्यामुळे या निवडणुकीद्वारे परिवर्तन अटळ असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
गढूळ पाणी स्वच्छ करा
सध्या देशात व राज्यात शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या कलगीतुरा सुरू आहे एकमेकाचे महत्व वाढविण्याचा दोघे प्रयत्न करीत असून मात्र एकमेकांच्या भानगडी ते बाहेर काढत नाहीत याबाबतीत त्यांची तेरी भी चूप मेरी भी चुप अशी भूमिका असून असल्या राजकारणामुळेच देशाचे वातावरण गडूळ पाण्यासारखे झालेले आहे हे गढूळ झालेले पाणी फेकून द्या नाहीतर आपले आरोग्य बिघडणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
‘नोटा बंदीच्या नावाखाली पैसा लुटणार्यांना पुन्हा सत्ता देऊ नका’
RELATED ARTICLES

