Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीडॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने फलटणमध्ये स्वच्छता मोहिम

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने फलटणमध्ये स्वच्छता मोहिम

फलटण: रेवदंडा ता.अलिबाग जि. रायगड येथील डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने रविवारी फलटण तालुक्यातील फलटण स्मशानभूमी, रावरामोशी पूल, साखरवाडी, सोमंथळी, विडणी येथील स्मशानभूमीची साफ सफाई करण्यात आली.
या वेळी सुमारे 6 टन सुका कचरा व 2 टन ओला कचरा गोळा करून तो डपिंग ग्राऊंड वरती नेवून टाकण्यात आला. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यत श्री समर्थ बैठकीतील 800 ते 900 श्री सदस्यांनी श्रमदानात सहभाग घेतला.
या उपक्रमात नगरपालिकेचे कर्मचारी, 4 ट्रॅक्टर, अग्निशामक दलाच 1 फायटर यांच्या माध्यमातून स्मशानभूमी परिसर स्वच्छ करून पाण्याने धुवून घेण्यात आला. यावेळी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर या उपस्थित होत्या.
महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण राज्यभर स्मशानभूमी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. फलटण विभागातून फलटण, खंडाळा, कोरेगाव( वाठारस्टेशन), बारामती, इंदापूर, पुरंदर, माळशिरस, श्रीगोंदा, कर्जत, दौंड इत्यादी ठिकाणी श्री समर्थ बैठकीतील श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवून स्मशानभूमी परिसर स्वच्छ करून घेतला.
गेली कित्येक वर्षापासून या स्मशानभूमीत अनेक झाडे झुडपे वाढून परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले होते.
रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यत श्री सदस्यांनी हातात झाडू, खोरे, टिकाव, घमेले घेऊन स्मशानभूमीत हजर राहून स्मशानभूमीची संपूर्ण साफसफाई करून परिसर चकाचक करण्यात आला. या उपक्रमांचे समाजातील सर्व स्तरांमधून कौतूक होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular