Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीराहुल देशमुख यांच्या कुटूंबियांना सर्वतोपरी सहकार्य करणार : ना.शिवतारे

राहुल देशमुख यांच्या कुटूंबियांना सर्वतोपरी सहकार्य करणार : ना.शिवतारे

फलटण: शिवसेना फलटण तालुका प्रमुख राहुल देशमुख यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सात्वंन करत आसताना कुटूंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहुन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे स्पष्ट आश्वासन राज्याचे पाटबंधारे व जलसंधारण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री ना. विजय शिवतारे यांनी दिले.
शिवसेना फलटण तालुका प्रमुख राहुल सदाशिव देशमुख रा. हनुमंतवाडी ता. फलटण हे दि. 1 मे रोजी सकाळी वीजेच्या तीव्र झटक्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोशीत केले.
गेल्या अनेक वर्षांपासून स्व.राहुल देशमुख शिवसेनेमध्ये सक्रिय होते. शिवसेनेच्या माध्यमातून विविध पदावर त्यांनी काम केले आहे. सामान्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा म्हणून तालुक्यात त्यांच्याकडे पाहीले जात होते.
स्व. राहुल देशमुख यांच्या मातोश्री व पत्नी ह्या दोघीसह संपूर्ण कुटुंब अद्याप सावरले नाही, ना. शिवतारे यांनी सर्वांचे सांत्वन करताना शासन आणि शिवसेना आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहुन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही देताना पत्नीस शासकीय नोकरीत सामावून घेणे व अन्य मदतीचे आश्वासन पालकमंत्र्यानी दिले.
पालकमंत्री ना. शिवतारे यांच्या समवेत शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, संतोष सोलळसकर, प्रदीप झणझणे, विलासराव गायकवाड, सचिन बिडवे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान पालकमंत्र्यांनंतर काही वेळातच युवानेते व माढा लोकसभा मतदार संघातील भाजपा सेना मित्र पक्षांचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular