Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीफलटण नगर परिषद उपनगराध्यक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा

फलटण नगर परिषद उपनगराध्यक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा

फलटण: फलटण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष मराठा क्रांती मोर्चा समन्वयक तसेच शिवजयंती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक नंदकुमार भोईटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमानी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने युवक कार्यकर्ते, नागरीक पदाधिकारी, शिक्षक, राजेगटाचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच समविचारी पक्षाचे पदाधिकारी व हितचिंतक उपस्थित होते.
डी एड चौक लक्ष्मीनगर येथील राहत्या घरी नंदकुमार भोईटे यांनी फलटण शहर व तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या,या वेळी त्यांनी घरातील महिलांनी त्यांचे औक्षवन करीत कुटुंबातील सर्वांनी मिळून त्यांना शुभेच्छा दिल्या त्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आदींचा समावेश होता त्यांना प्रत्यक्ष आणि दूरध्वनी वरून विधान परीषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले,आ.दीपक चव्हाण तसेच राजघराण्यातील सर्व मान्यवर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे ना.निंबाळकऱ, जेष्ठ नेते सुभाष शिंदे, उपसभापति शिवरूपराजे खर्डेकर, माऊली सावंत, अभिजित सुर्यवंशी बेडके, अमोलशेठ सस्ते, अ‍ॅड. विरसेन कदम,पोपट बर्गे,टी. के.कदम, हणमंत जगताप, अरविंद वाघमोडे व मराठा क्रांती मोर्चा,फलटण तालुका शिवजयंती उत्सव समिती, नंदकुमार भोईटे मित्रमंडळ, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, धैर्यशील जाधव,यशवंत डांगे फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा निताताई नेवसे, सर्व नगरसेवक, कर्मचारी, मिलिंद नेवसे, सुधीर अहिवळे (चेअरमन), उद्योजक दिपक देशमुख, उद्योजक चंदन साळुंखे,जयवंत शिंदे, विकास जगताप, राहुल निंबाळकर, यशवंत खलाटे पाटील, युवराज पवाऱ, शक्ती भोसले़, विक्रम चोरमले, युवराज शिंदे, नानासो इवरे, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विक्र टोमोबाईल्स, जीवनज्योती गणेशोत्सव मंडळ, किरण ट्रेडर्स, लक्ष्मीनगर सांस्कृतिक मंडळ, एकदंत गणेशोत्सव मंडळ,राजीव गांधी वसाहत फलटण आदिनी शुभेच्छा दिल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular