Sunday, June 22, 2025
Homeताज्या घडामोडीफलटण तालुक्यातील राष्ट्रवादी पुरस्कृत तेरा ग्रामपंचायतीत सरपंच पदावर झेंडा

फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी पुरस्कृत तेरा ग्रामपंचायतीत सरपंच पदावर झेंडा

फलटण : फलटण तालुक्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला यामध्ये तेराही ग्रामपंचायतीत सरपंच पदावर राष्ट्रवादी पुरस्कृत राजे गटाने झेंडा फडकविला असून या आधी विठ्ठलवाडी ग्रामपचांयत बिनविरोध झाली आहे.
फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत खडकीसाठी 7 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सरपंच पदासह, 6 जागा राजेगट तर विरोधी गटाला 1 जागा मिळाली , विद्यमान आमदार दिपकराव चव्हाण यांच्या तरडगाव ग्रामपंचायतीत 15 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सरपंच पदासह, 12 जागा मिळवीत आपले वर्चस्व सिद्ध केले तर विरोधी गटाला 3 जागा मिळाल्या, ग्रामपंचायत मिरगावच्या 7 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सरपंच पदासह, 2 जागा राजेगट तर विरोधी गटाला 5 जागा मिळाल्या, ग्रामपंचायत ढवळेवाडी(आसू) 7 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सरपंच पदासह, 6 जागा राजेगट तर विरोधी गटाला 1 जागा मिळाली, ग्रामपंचायत चांभारवाडीसाठी 7 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सरपंच पदासह 4 जागा राजेगट तर विरोधी गटाला 3 जागा मिळाल्या. ग्रामपंचायत शिंदेमाळ 7 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सरपंच पदासह 4 जागा राजेगट तर विरोधी गटाला 3 जागा मिळाल्या. ग्रामपंचायत दालवडी 7 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सरपंच पदासह 4 जागा राजेगट तर विरोधी गटाला 3 जागा मिळाली.
विद्यमान जि.प.सदस्य दत्ता अनपट यांच्या ग्रामपंचायत सासवड येथे 11 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सरपंच पदासह, 7 जागा राजेगट तर म्हस्कू अनपट गटाला 4 जागा मिळाल्या जर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी सरपंच पदासाठी उभ्या केलेल्या उमेदवाराला मानहानीकार पराभवाला समोरे जावे लागले. ग्रामपंचायत टाकूबाईचीवाडी 7 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सरपंच पदासह, 7 जागा राजेगटाने जिंकत एकहाती सत्ता मिळवली.ग्रामपंचायत मिर्‍याचीवाडीत 7 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सरपंच पदासह 5 जागा राजेगटाला मिळाल्या तर दोन जागा रिक्त राहिल्या. पुर्व भागातील महत्वपुर्ण असलेल्या ग्रामपंचायत गोखळीत 11 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सरपंच पदासह मनोजतात्या गावडे यांनी 8 जागा राजेगट तर राजेगट अंतर्गत विश्‍वासदादा यांना 3 जागा मिळाल्या.
सर्व 13 ग्रामपंचायतीत बर्‍यापैकी ग्रामपंचायतीत राजेगट अंतर्गत लढती झाल्या कोणत्याही ग्रमपंचायतीत विरोधक म्हणून काँग्रेस,शिवसेना, भाजप यांचे कुठेही अस्तित्व दिसले नाही यावरून फलटण तालुक्यात राजेगटोन पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular