Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीमाढा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा

माढा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा

रणजितसिंहाच्या विजयाचे वृत्त समजताच कार्यकत्यांनी केली गुलालाची उधळण, फटाक्यांची मोठी आतिषबाजी
फलटण: संपूर्ण देशाचे लक्ष वेधुन घेतलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातुन भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयी मिळवत या मतदारसंघावर प्रथमताच भाजपाचा झेंडा रोवला.रणजितसिंहाच्या विजयाचे वृत्त समजताच कार्यकत्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची मोठी आतिषबाजी केली.
माढा लोकसभा मतदारसंघ विविध कारणाने चर्चेत होता.राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी पुन्हा माढ्यातुन उभे राहण्याची केलेली घोषणा आणि विरोधानंतर घेतलेली माघार यामुळे मतदारसंघ चर्चेत आला होता.राष्ट्रीय कॉग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन मिळवलेली उमेदवारी तर दुसरी कडे सोलापुर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळविली होती.या दोघा मिञांमध्ये होणारा सामना अतीतटीचा आणि चुरशीचा झाला.


आज सकाळी सोलापुर येथे मतमोजणीला सुरुवार होताच सुरुवातीच्या काही फेरीत मताधिक्य कधी भाजपला तर कधी राष्ट्रवादीला मिळत होते.तर अशा परिस्थितीत धाकधुक वाढविणारी ही निवडणुक ठरु लागली होती.8 फेर्‍या नंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थोडी थोडी आघाडी वाढवत नेहली.15 व्या फेरी अखेर 20 हजारहुन अधिक मताधिक्य रणजितसिंहांनी घेतले होते.
रणजितसिंहांचे वाढत चाललेले मताधिक्य पाहता हे मताधिक्य कमी करणे संजय शिंदे यांना शक्य झाले नाही.
शेवटच्या काही फेर्‍यात मताधिक्य वाढत जाऊन रणजितसिंह…….मताधिक्याने विजयी झाले.रणजितसिंह हे विजयाचे समीप पोहचताच माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी कार्यकत्यांनी गुलालाची प्रचंड उधळण करत फटाक्याची आतिषबाजी केली.सोबत रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या जोरदार विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular