फलटण : माढा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी इतिहासात नोंद होईल असा विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार जरी उभे असते तरीही त्यांचा पराभव रणजितसिंह यांनी केला असता असे सांगून रणजितसिंह यांचा विजय अभूतपूर्व आहे असे मत महसूलमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले. ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाच्या तथा आभार सभेत फलटण येथे ते बोलत होते. यावेळी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, उत्तमराव जानकर, मा.आ.दिलीपराव येळगावकर, अनिल देसाई उपस्थित होते.
यावेळी ना.चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की स्व.पंडित नेहरू यांच्या नंतर सर्वात मोठा विजय या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळवला असून तुमचे या वेळी आभार मानण्यासाठी आलो असून बरेच बोलायचे आहे मात्र थोडं शिल्लक ठेऊ विधानसभा निवडणुकीत बोलू असे सांगत आपला माणूस खासदार झाला याचा आनंद तुमच्या चेहर्यावर दिसत असून तुम्ही सर्वांनी गेली महिनाभर आपण केलेलं कष्ट फळाला आले असून तुम्ही ज्या प्रमाणे काम केलं समजा शरद पवार जरी उभे असते तरीही ते पडले असते असे सांगून मतदारांचे आभार मानले या वेळी पाटील म्हणाले की येत्या 30 तारखेला मोदी सरकारचा शपथविधी होणार असून उद्या एन डी ए ची बैठक होणार असून त्या मध्ये आपले लाडके पंतप्रधान मोदी यांना संसदीय नेते म्हणून निवडले जाईल त्या नंतर राष्ट्रपती यांना भेटून त्यांचे नाव पंतप्रधान म्हणून पुढे केलं जाईल असे त्यांनी सांगितले तसेच गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने केलेल्या काम या वरती आपण मते मागितली मात्र विरोधकांनी मोदी यांच्या वर खालच्या पातळीवर टीका केली मात्र त्यांनी विरोधकांना कधीही उत्तर दिले नाही कारण त्यांना त्यांच्या कामावर त्यांचा विश्वास होता असे पाटील यांनी सांगितले तसेच आमचं ठरलंय याची आठवण करून देत कोल्हापूर पॅटर्न आपण राबविण्यात तुम्ही यशस्वी झाला असे ना.पाटील यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की शेतकर्यांना महिना 6 हजार रुपये पेन्शन दिली या मुळे शेतकरी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असे त्यांनी सांगितले या वेळी आ.नारायण आबा पाटील,समशेरसिंह नाईक निंबाळकर,दिगंबर आगवणे,अनुप शहा,ऍड. नरसिंह निकम,सुशांत निंबाळकर, जयकुमार शिंदे,विश्वासराव भोसले,बाळासाहेब कदम,अशोकराव जाधव, यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील मान्यवर उपस्थित होते.
रणजितसिंह यांचा विजय अभूतपूर्व आहे : ना.चंद्रकांतदादा पाटील
RELATED ARTICLES

