Wednesday, December 3, 2025
Homeठळक घडामोडीसातारा जिल्ह्याची राजकीय गणिते भविष्यात बदलणार

सातारा जिल्ह्याची राजकीय गणिते भविष्यात बदलणार

संजयमामा शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व धोक्यात
फलटण (अशोक भोसले): राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य किल्ला राहिलेल्या सातारा व सोलापूरजिल्हा मिळुन नव्याने अस्तित्वात आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात देशाचे पंतप्रधान नेते तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नेतृत्व केलेल्या माढा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव करून विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व धोक्यात आणल्याने सातारा जिल्ह्याची राजकीय गणिते भविष्यात बदलणार असल्याचे बोलले जात आहे.
पुर्नरचनेत 2009 साली सोलापूर जिल्ह्यातील चार व सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होऊन माढा लोकसभा मतदार संघ स्थापन झाला होता. यामध्ये पहिल्या निवडणूकित देशाचे माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी लोकसभेमध्ये नेतृत्व केले यामुळे या दुष्काळी पट्याचा तयार झालेला मतदार संघ हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ म्हणून ओळखू लागला यानंतर 2014 च्या निवडणुकीमध्ये जबरदस्त आलेल्या मोदी लाटेत पुन्हा एकदा तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी जिंकून राष्ट्रवादीचा हा मतदार संघ पुन्हा ओळख पटवून दिली मात्र दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला या पक्षाकडून विकासाची गंगा पोहचवता न आल्याने मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जनता गेली यामुळे 2019 निवडणुकीत बर्‍याच गोष्टींचा पोहापोह होत माढा मतदारसंघ देशामध्ये गाजला यामुळे देशासह राज्याचे याकडे लक्ष लागले होते.
माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शरद पवार उभे राहणार अशी चर्चा रंगली. मात्र विधानपरिषदेतील पराभव जिव्हारी लागल्याने शेखर गोरेच्या कार्यकर्त्यांनी फलटण येथे आयोजित संवाद मेळाव्यात असंवाद घडवत आणीत शरद पवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यात भाग पाडले. संवाद मेळाव्यात शेखर गोरेच्या समर्थकांनी केलेला गोधळ पूर्ण राज्यात गाजला होता.तथापि अनपेक्षितपणे शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा पुढे आली. मात्र या तिघांपैकी कोणा एकाचे नाव निश्चित होत नव्हते यामुळे राजकारण मुरब्बी असलेल्या शरद पवारांनी भाजपाच्या साथीने सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर बसलेल्या संजयमामा शिंदे यांना गळाला लावत माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देऊन भाजपावर कुरघोडी केली मात्र भाजपाने कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकायचाच अशी खुणगाठ बांधली यानंतर सातारा जिल्ह्याचे विद्यमान जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपामध्ये घेत उमेदवारी देण्यात आली.
दुध व साखर व्यवसायातील एक अभ्यासु,तरुण व्यक्तीमत्व युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असतानाच माढा लोकसभा मतदारसंघातुन कॉग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार कोण यासंबंधी चर्चेच्या अनेक फेर्‍या सातारा व सोलापूर जिल्ह्यातील कॉग्रेस व राष्ट्रवादीसह अन्य पक्षातील नेते,
कार्यकत्यांमध्ये खा.शरद पवार यांच्या उमेदवारीची घोषणा होईपर्यंत सुरू होती त्यातुन दोन्ही जिल्ह्यातील अनेक नेते एकत्र आले त्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आणि सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि तात्कालीन सातारा जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा समावेश होता.खा.शरद पवार यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतरही लोकसभा निवडणुक आणि उमेदवारीची चर्चा या सर्व नेते कार्यकत्यांमध्ये सुरु राहिली त्यातुन राष्ट्रीय कॉग्रेसच्या काही नेत्यांनी केवळ आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आपण मदत करावयाची आणि त्यानंतर येणार्‍या विधानसभा अथवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत माञ हा आघाडी धर्म पाळला जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सहकार्य न करण्याची चर्चा गतीमान झाली.
संजयमामा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार म्हणून आमने सामने उभे ठाकल्यानंतर त्या अगोदर असलेली मैत्री दुरावली आणि निवडणुकीच्या रणांगणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत राहिल्या त्यातच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अकलूज येथे घेतलेल्या जाहीर सभेचे युपीए वर घणाघात केला. रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री व मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांसह खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनीही सहभागी होऊन वातावरण रणजितसिंह यांच्या बाजूने वळविले किंबहुना सारा माहोल भाजपमय झाला त्यांचे रुपांतर अखेर विजयात झाले.
विधानसभा मतदारसंघ निहाय
मते खालील प्रमाणे
करमाळा : करमाळा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी ने या मतदारसंघात 30429 मताचे लीड घेतल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादी ने आपली पकड मजबूत ठेवली आहे.
माढा : तसेच माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे यांना अपेक्षित मतदान न झाल्याने केवळ 6502 मतांची आघाडी मिळाली या मुळे इथे निर्णायक मतदान लीड न मिळालेच कारण पराभवाला कारणीभूत ठरले आहे.
सांगोला: सांगोला विधानसभा मतदारसंघात संजयमामा शिंदे यांना नाममात्र 3374 मतांची आघाडी मिळाली मात्र इतर तुलनेत सर्व ताकद लावली असताना एवढी कमी आकडेवारी पाहून इथंच पराभवाची कुणकुण लागली होती.
माळशिरस: ज्या मतदारसंघात माढ्याची सर्व गणिते बदलली अशा माळशिरस ने भजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तब्बल 1,00630 चे घवघवीत मतदान पारड्यात टाकले या मुळे खा.विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले प्रमाणे भाजपच्या उमेदवाराला विजयी केले.
माण : या मतदारसंघात विद्यमान आमदार जयकुमार गोरे व त्यांचे बंधू शेखरभाऊ गोरे यांनी सर्वांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी ला आसमान दाखवत 23215 चे मतदान देऊन रणजितसिंह यांच्या विजयात शिखर चढवले.
फलटण: आपला माणुस व स्थानिक उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सुप्तवस्थेत साथ देत कमी का होईना पण लीड देत आम्ही ही कुठं कमी नाही असे दाखवून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना चक्रावून सोडत आपला हक्काचा माणुस तब्बल 23 वर्षांनी उमेदवार दिल्लीच्या संसदेत पाठवला आहे.
भाजपाला 94879
राष्ट्रवादीला 93666 मिळाली
भाजप लीड – 1213

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular