Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडी‘विज्ञान प्रदर्शनातून भावी शास्रज्ञ निर्माण होतील’

‘विज्ञान प्रदर्शनातून भावी शास्रज्ञ निर्माण होतील’

फलटण: विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात नवनिर्मितीची जाणीव निर्माण भावी शास्रज्ञ निर्माण होतील अशी अशा नगर अभियंता पी. एन. साठे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कुल च्या वतीने आयोजित विज्ञान प्रदर्शन, कला व हस्तकला प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अद्यक्षस्थानी स्कुल चे सचिव रणजितसिंह भोसले उपस्थित होते.
स्कुल च्या प्रशासकीय संचालिका प्रियदर्शनी भोसले, स्वाती फुले, नाझीया तांबोळी, डाएट प्रशिक्षण वर्गाच्या सौ. कुंभार मॅडम, गणेश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवस सुरु असलेल्या या प्रदर्शनास सदगुरु उदयोग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले, सदगुरु शिक्षण संस्थेचे सचिव मधुबाला भोसले, जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ,सदगुरु पतसंस्थेचे सी.ई.ओ. संदीप जगताप आदी मान्यवरांनी भेट दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विध्यार्थ्यांनी बनविलेले विविध वैज्ञानिक साहित्याची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी साहित्यामागील उद्देश व हेतू स्पष्ट केले. तसेच मुलगी वाचवा, जय जवान जय किसान, निसर्ग, आदी विषयावरील चित्रांची व हस्तकलांची पाहणी पाहुण्यांनी केली. भेटी प्रसंगी रवींद्र बेडकिहाळ म्हणाले, मुलांची वैज्ञानिक प्रकल्पातील जाणीव महत्त्वाची वाटली, त्यात जिज्ञासूपणा व शोध घेण्याची प्रवृत्ती दिसून आली.
या प्रसंगी 61 विज्ञान साहित्याची उपकरणाची मांडणी करण्यात आली होती. यामध्ये सूर्यमाला, अवकाशयान, इलेक्ट्रॉनिक क्रेन, वॉटर कुलर ऊर्जा मुक्त लाईट जनरेटर वृक्षसंवर्धन, इलेक्ट्रॉनिक कंडकटर आदी विविध अंगी वैज्ञानिक प्रकल्पांची मांडणी करण्यात आली होती. परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांनी,पालकांनीही या प्रदर्शनाचा लाभ घेतला व नवोपक्रमाचे कौतुक केले. ब्रिलियंट स्कुलचे प्राचार्य विश्वास केसकर यांनी स्वागत केले. विभाग प्रमुख हेमलता बनकर यांनी आभार मानले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular