फलटण: पाचवा आतंरराष्ट्रीय योग्य दिवस आर्ट ऑफ लिव्हिंग फलटण व श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि 21 रोजी सकाळी 6 ते 8 जाधववाडी (फलटण) येथे संपन्न झाला. फलटण शहरात विविध ठिकाणी ही आतंरराष्ट्रीय योग्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
आज भारतासह संपूर्ण जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जात आहे. योग दिनानिमित्त क्लायमेट अक्शन ही थीम आहे. आज फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 377 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आजच्या दिवशी भारतात 23 ठिकाणी विरभद्रासन या आसनामध्ये तीन मिनिटांचे वर्ड रेकॉर्ड स्थापित करण्यात आले. आज जगामध्ये 2 अब्ज लोक योगा प्राणायाम करतात योग हा जात धर्म पंत या सर्व सीमा पार करून लोकांना यांचा खूप चांगला फायदा व शारीरिक व मानसिक स्तरावर झाला आहे. जे लोक योगा करत आहेत नाहीत त्यांनी सुद्धा योग्य प्राणायम करावा असा संदेश यावेळी देण्यात आला.
योगा म्हणजे फक्त आसन करणे व्यायाम करणे नाही तर योग्य म्हणजे शरीर मन व आंतरिक शक्ती यांचे मिलन यामुळे आपल्या जीवनात आरोग्य आनंद व समृद्धी लाभते त्यामुळे सर्वांनी योगा करावा हा संदेश देण्यात आला.
यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, उपअभियंता सुजाता कदम, पोलीस निरीक्षक प्रताप पोमन, आर्ट ऑफ लिव्हिंगचे आपेक्स मेंबर प्रदीप खानविलकर, प्रेनसिपल सौ. फाळके, सौ. दीक्षित, तसेच योगा प्रशिक्षक सुनील नायर, प्रवीण भोसले, अड सचिन शिंदे व इतर हजर होते.
आंतरराष्ट्रीय योग दिन फलटण शहरात उत्साहात
RELATED ARTICLES