Sunday, December 14, 2025
Homeठळक घडामोडीपुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांची आज देशाला गरज -: युवराज...

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांची आज देशाला गरज -: युवराज श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर

फलटण – पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे काम माळवा प्रांतामध्ये म्हणजे मध्य प्रदेश तसेच राजस्थान, उत्तरप्रदेशासह महाराष्ट्रातील काहि भागात होते. त्याचबरोबर याच्या पलिकडे म्हणजे दक्षिणेतील कन्याकुमारिपासून ते उत्तरेत बुध्दगयापर्य॔त व नेपाळच्या पशुपती नाथापर्यंत अहिल्याबाई होळकर यांचे कार्य आहे. मी होळकर राज घराण्याचा जन्मलो असलो तरी आपल्यातीलच एक बांधव आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती सर्वज्ञात असल्यामुळे आज त्यांच्या विचारांची गरज देशाला आहे , असे प्रतिपादन होळकर घराण्याचे १३ वे वंशज युवराज श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केले.

अहिल्या क्रांती संघटना प्रेरित क्रांती शौर्य सेना आयोजित महाराष्ट्रातील पहिली महिला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी इंदापूरचे कार्यसम्राट आमदार दत्तात्रय भरणे , कु.स्नेहल धायगुडे ,डॉ उज्वला हाके , आस्था टाइम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले, डाॅ.प्रकाश देवकाते ,भाजपचे नेते पै. बजरंग गावडे, इ.मान्यंवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे होळकर म्हणाले,की आजही महिलांना काम करित असताना अनेक बंधने व अडचणी येतात तर त्यावेळच्या परिस्थितीत तर महिलांना काम करणे खूप अवघड होते. तरी देखील अशा वेळी मुघलांच्या राज्यात हिंदूचे दैवत काशी विश्वेश्वराच्या मंदीराचा जिर्णोध्दार केला तसेच हायद्राबादच्या निजामच्या राज्यामधील काही मंदीरांचा म्हणजे औंढा- नागनाथ, परळी- वैजनाथ येथील शत्रू राज्यातील मंदिरांचा जिर्णोध्दार केला. एवढेच करून त्या थांबल्या नाहित तर लोकोपयोगी कामे म्हणजे त्यांनी धरणे, तलाव, विहिरी,धर्मशाळा घाट बांधले तसेच अनेक मंदिरांचा जिर्णोध्दार केला.यावरून त्यांची परराष्ट्र निती व राज्यातील नियोजन कसे होते व तसेच आजूबाजूच्या राज्याशी संबंध कसे सलोख्याचे होते हे दिसून येते. त्यांनी पूर्ण भारतभर काम केले.म्हणून आजही त्यांच्या कामाची तुलना कोणा बरोबर होवूच शकत नाही. तसेच त्यांनी त्या वेळी जलसंधारणासारखी हि कामे केली म्हणूनच त्यांच्या कामाची प्रेरणा आपण घेवून भविष्यात काम केले पाहिजे असे सांगून ते म्हणाले की कल्याणीताई आपले काम चांगले चालू आहे. आपल्या पाठीशी आपला बंधू म्हणून सदैव राहीन तसेच आपले काम निश्चितच कौतुकास्पद असेच आहे. असे शेवढी युवराज श्रीमंत भुषणसिंह म्हणाले.
यावेळी इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे, बालव्याख्याता मंगेश झन्जे तसेच यू .पी .एस .सी मध्ये यश मिळविणाऱ्या कु.स्नेहल धायगुडे,आस्थाा टाईम्सचे कार्यकारी संपादक कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले,पै.बजरंग गावडे, इ. मान्यंवर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व सौ.कल्याणी वाघमोडे यांच्या अविरत चालू असणाऱ्या समाजप्रबोधनात्मक कार्याचे सर्व मान्यवरांनी कौतुकही केले .
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या डॉ.उज्वला हाके , श्री.छत्रपती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पाटील , पंचायत समिती सदस्य राहुल झारगड , फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ.वैशालीताई चोरमले , अँड .तेजसिंह पाटील,मंदाकिनी घुले,मंजुळा रूपनवर , विजयताई पिंगळे,फुलाताई देवकाते , रोहिणी रूपनवर , डॉ.उषा देशमुख आदीं मान्यवर उपस्थित होते .
या महोत्सवात चित्रपट अभिनेता अमर देवकर, गुप्तचर विभागाची कु.स्वाती चोरमले, पोलीस उपनिरीक्षक ज्योती चोरमले, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कार्तिक दोडताले, स्त्री आधार केंद्र बारामती अंजु वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र वाघमोडे, भाग्यश्री पाटील, डॉ.गणेश बोके, सामाजिक कार्यकर्ते राजू अहिरे ,पी .एस .आय रणजित देवकाते इ. मान्यवर मंडळी यांचा विशेष कार्याबद्दल सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रतिष्ठान व क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्षा सौ.कल्याणीताईं वाघमोडे म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची विचारधारा टिकविण्यासाठी आणि महिलांना प्रोत्साहन देवून महिलांच्या जनजागृतीसाठी व त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी महिला म्हणून प्रयत्न या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातो असे मत कल्याणीताईंनी प्रास्ताविकात मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर बुरुंगले यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular