फलटण : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा फलटण तालुक्यातील पहिल्या मुक्कामी तरडगाव येथे स्थिरावला असून आज प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फलटण शहरात प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटणमधील महसुल, पोलिस, पंचायत समिती, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था/ सामाजिक संस्था सह धार्मिक, नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट अध्यात्मिक संस्थानी माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. दि.4 रोजी पालखी सोहळा फलटण नगरीत विसावणार आहे.
माउलींच्या स्वागतासाठी अवघी फलटण नगरी सजली असून फलटणकरांना माऊलींचा आगमनाची आतुरता लागली आहे. फलटण तालुक्यातील तरडगांव, फलटण, बरड या तीन गावात प्रत्येकी एक दिवस पालखीचा मुक्काम होणार असून पालखी सोहळ्यातील वैष्णवांची कोणतीही गैरसोय होवु नये यासाठी वरील सर्वच प्रशासन व सामाजिक संस्था यांच्या वतीने नेटके नियोजन करण्यात आले आहे.
फलटण नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य शासन बांधकाम पोलिस व महसुल प्रशासन, वीज वितरण कंपनी, दुरसंचार, पाटबंधारे, आरोग्य आदी शासकीय विभागासह अन्य स्वयंसेवी संस्थानी पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी कंबर कसली आहे. फलटण नगरपालिकेने पालखी तळावर पुरेशी प्रकाश ( लाईट ) सुविधा , पिण्याच्या पाण्याचे नळ , मोबाईल टायलेट , पाणी टँकर फिडर , पालखी मार्ग व विमानतळ परिसर स्वच्छता , भाविकांना दर्शनासाठीची सोय , पालखी विसावा ठिकाणच्या रिगंणात तांबडी मातीची व्यवस्था आदी सोयी -सुविधा उपलब्ध केल्या आहेत.विमानतळ , पोलिस चौकी , गिरवी नाका म माळ जाई मंदिर , घडसोली मैदान या पाच ठिकाणी 24 स्टॅण्ड पोस्ट व्दारे पाणीपुरवठा सोय केली आहे पालखी मुक्काम विमानतळावर स्वच्छता , औषध फवारणी , विद्युत पुरवठा म पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटविणे ,रस्ता दुरूस्ती आदी पालखी आगमनापुर्वीची कामे करण्यात आली आहेत.
माऊलीआरोग्य विभागाने पिण्याचे पाणी तपासणी केली आले , पाणी निर्जंतुकीकरण , 9रुग्णवाहिका , मोबाईल ओपीडी , खाजगी दवाखान्यात आरक्षात जागा म टँकरच्या 500खेपा आदी नियोजन केले आहे.पंचायत समितीच्या वतीने पाणी टॅन्कर , पाणी टॅन्कर फिडर , पालखी तळावर आरोग्य पथक पुरेसा औषधसाठा , पाणी शुद्धीकरण औषध , तालुका आरोग्य विभागामार्फत आरोग्य व वैधकीय पथके , आपत्कालिन पथक स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात , आरोग्य सेवक , आरोग्य सहाय्यक व अन्य कर्मयारी नियुक्त करणे त आले आहेत.
महसुल विभागाच्या सार्वजनिक वितरणक व्यवस्थेकडुन तरडगांव ते बरड गावच्या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेसा रॉकेल साठा , गॅस सिलेंडर उपलब्ध करण्यात आले आहेत.
वीज वितरण कंपनीने विजपुरवठा निर्माण करणारी यंत्रणा उभारली आहे चोवीस तास सेवा देणारा सनियंत्रण कक्ष उभारला आहे , दुरसंचार विभागाने पालखी सोहळ्यातील वारकर्यांसाठी शहर व तालुक्यात भ्रमणदुरध्वनी सुविधा निर्माण करून दिली आहे.
पालखी मुक्काम काळात शांतता व सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलिस प्रशासनाने पोलिस अधिकारी कर्मचारी होमगार्डस यांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.पालखी सोहळा यशस्वीतेच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधांसह अन्य विविध शासकीय विभागाच्या वतीने यंत्रणा कार्यान्वीत केल्या आहेत.
आज पालखी सोहळा फलटण नगरीत विसावणार
RELATED ARTICLES